सोमवार, २१ सप्टेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
रविंद्र चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना आधाराचा हातभाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक मदतीचा हात’जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांच्या शासकीय निवासस्थानी बाप्पाचे दर्शन - आ. निलेश राणे सिंधुदुर्गनागरिकांसाठी शासनाच्या उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शनशाळा, शिक्षण वाचविण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलनसिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारवाढदिवसाला उत्सव नव्हे, सेवाभावाचा संकल्प.!संघटन बळकटीसाठी गावागावात सक्रिय व्हा; जनतेशी संपर्क वाढवा – आमदार प्रमोद जठारवाढदिवसाच्या निमित्ताने 'रवी'तेजाने उजळली 'विशाल' गुरू शिष्य परंपरासिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाररविंद्र चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना आधाराचा हातभाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक मदतीचा हात’जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांच्या शासकीय निवासस्थानी बाप्पाचे दर्शन - आ. निलेश राणे सिंधुदुर्गनागरिकांसाठी शासनाच्या उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शनशाळा, शिक्षण वाचविण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलनसिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारवाढदिवसाला उत्सव नव्हे, सेवाभावाचा संकल्प.!संघटन बळकटीसाठी गावागावात सक्रिय व्हा; जनतेशी संपर्क वाढवा – आमदार प्रमोद जठारवाढदिवसाच्या निमित्ताने 'रवी'तेजाने उजळली 'विशाल' गुरू शिष्य परंपरासिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार

नागरिकांसाठी शासनाच्या उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शन

📅 २१ सप्टेंबर, २०२६👁 १०ब्रेकिंग
नागरिकांसाठी शासनाच्या उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शन

*कोंकण एक्सप्रेस

नागरिकांसाठी शासनाच्या उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शन

साटेली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम

सिंधुदुर्ग

साटेली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांशी संवाद साधणे तसेच त्यांच्या अडचणी व प्रतिक्रिया जाणून घेणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी ग्रामस्थ, तरुण मंडळी आणि गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांशी थेट संवाद साधून शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात येणाऱ्या अडचणी, नागरिकांच्या प्रतिक्रिया व अपेक्षा जाणून घेतल्या.

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत नागरिकांना शासनाच्या विविध विभागांच्या योजना व सेवांची माहिती देण्यात येत आहे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अडसूळ यांनी पर्यावरणपूरक उपक्रम, सायबर सिक्युरिटीबाबत मार्गदर्शन करत डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर करण्याचे आवाहन केले. तसेच गणेशोत्सवाचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी ‘Bappa.org’ पोर्टलबाबत माहिती देण्यात आली. महसूल विभागामार्फत नागरिकांना उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सेवा व सुविधांची माहिती देण्यात आली. गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा उपयोग जनजागृतीसाठी करत शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. माहिती कार्यालयाच्या वतीने मंडळास ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल सन्मानचिन्ह देण्यात आले.

यावेळी साटेलीच्या सरपंच छाया धर्णे, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, मंडळाचे ऋषिकेश धर्णे, शामसुंदर धर्णे, लक्ष्मण मयेकर, पंकज गाड, दत्तात्रय धर्णे यांच्यासह मंडळाचे इतर सदस्य, ग्रामस्थ आणि तरुण मंडळी उपस्थित होती.

गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ग्रामपंचायती तसेच गर्दीच्या ठिकाणी ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम राबविण्यात येत असून, विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या सहभागातून नागरिकांना योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि आवश्यक सेवांबाबत माहिती देण्यात येत आहे. या माध्यमातून शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासोबतच नागरिकांच्या प्रश्नांना आणि सूचनांना जाणून घेण्याचे काम करण्यात येत आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →