बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

वाढदिवसाला उत्सव नव्हे, सेवाभावाचा संकल्प.!

📅 २० सप्टेंबर, २०२६👁 ७ब्रेकिंग
वाढदिवसाला उत्सव नव्हे, सेवाभावाचा संकल्प.!

कोंकण एक्सप्रेस

वाढदिवसाला उत्सव नव्हे, सेवाभावाचा संकल्प.!

सावंतवाडी :प्रतिनिधि

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकाराने सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांत विविध सामाजिक उपक्रम

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात यंदा विविध सामाजिक व जनहितोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भाजपाचे राज्य युवा नेते विशाल परब आणि सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकाराने तसेच भाजपा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन्ही तालुक्यांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छा, केक किंवा सत्कारापुरता मर्यादित न राहता, समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याची संधी असावी, या भावनेतून या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजू व विशेष घटकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या उपक्रमांमध्ये सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील दिव्यांग बांधवांना विशेष प्राधान्य देण्यात येणार असून, त्यांच्या गरजा व अडचणी जाणून घेत त्यांच्यासोबत संवाद साधत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

याबाबत भाजपाचे राज्य युवा नेते विशाल परब म्हणाले की, “वाढदिवस हा केवळ उत्सवाचा दिवस न राहता समाजासाठी काहीतरी करण्याची संधी असावी, या भावनेतून यंदा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन्ही तालुक्यांमध्ये सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.”

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी या भावनेतून उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन्ही तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी हे सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये नागरिकांचा सहभाग राहणार आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सावंतवाडी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →