तोंडवलीती संदेश पारकर यांनी केलं शिवसैनिकांना मार्गदर्शन

तोंडवलीती संदेश पारकर यांनी केलं शिवसैनिकांना मार्गदर्शन

*कोकण Express*

*तोंडवलीती संदेश पारकर यांनी केलं शिवसैनिकांना मार्गदर्शन*

*तोंडवलीती संदेश पारकर यांची सदिच्छा भेट*

तोंडवलीतील पुष्प मंगल निवासस्थानी कुडतरकर समाज आणि इतर शिवसैनिक यांना मार्गदर्शन करण्यासाठी संदेश भाई पारकर त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. गेले ते आपले नव्हतेच ते लाचारी साठी गेले अशी टिका भाजप प्रवेश केलेल्या तोंडवली बावशी ग्रामपंचायत माजी सरपंच उमेश कुडतरकर यांच्यावर केली. पक्षाच्या कठीण परिस्थितीत आणि आपली सत्ता नसतानाही आपल्या सोबत शेवटपर्यंत असतो तो खरा कट्टर शिवसैनिक असतो. खरा शिवसैनिक कधीच गद्दारी फितुरी करत नाही फितुरी करतात ते लाचारी पैशासाठी .
तोंडवली – बावशी ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचा प्रभाव झाला तो राग मनात ठेवून प्रत्येकाने कामाला लागा आणि येत्या कणकवली पंचायत समिती निवडणूक जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या सेनेचा भगवा फडकवण्यासाठी तयार व्हा कोकणी माणसाला आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब माणसाला खरा न्याय आणि हक्क जर कोणी मिळून दिला असेल तर तो शिवसेनाप्रमुख बाळा साहेब ठाकरे यांनी . या राण्यांनी फक्त आपले किशे भरले अशी टीका संदेश पारकर यांनी केली. तुम्ही एक गेला म्हणून निराश होऊ नकात असे किती गेले किती आले त्याची फिकीर शिवसैनिकांना नसते त्यामुळे आता जोमाने कामाला लागा अस प्रोत्साहन संदेश भाईंनी शिवसैनिकांना दिल.
या कार्यक्रमाला तोंडवली शाखा प्रमुख सुनील पवार,बावशी शाखा प्रमुख महेंद्र मर्ये,ग्रा.स. मनश्री कांडर, हेमंत कांडर,तात्या निकम,भाऊ रांबाडे, आबु मेस्त्री अमित इस्वालकर, अजित कुडतरकर,अशोक कुडतरकर, जयवन्त कुडतरकर ,दिनकर कुडतरकर,प्रकाश नारकर,श्रुती कुडतरकर,सीमा पेडणेकर, कल्याणी कुडतरकर, जयश्री कुडतरकर, लक्ष्मी कुडतरकर, इत्यादी शिवसैनिक आणि माता भगिनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!