*कोकण Express*
*जळीत कार प्रकरणी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हा उप अधिक्षकांची भेट*
*गुन्हेगारास तात्काळ अटक करुन कारवाई करावी अन्यथा स्वातंत्र दिनी करणार तीव्र आंदोलन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे सचिव श्री. धीरज हुंबे यांची MH- 07 AG- 0349 ही मारुती सुजुकी बलेनो कार रविवारी मध्यरात्री 01:30 ते 02:00 च्या दरम्यान आपल्या घरासमोरील अंगणात अचानक काही भुरट्या गुंडानी रॉकेल टाकुन पेटवण्याचा प्रयत्न केला,दरम्यान एवढ्या मध्यरात्री धीरज हुंबे यांची पत्नी दर्शना हुंबे यांनी आपल्या अंगणात मोठ्या प्रमाणात उजेड व आवाज कसला येतो हे धीरज हुंबे यांना झोपेतुन जागे करुन पाहण्याचा प्रयत्न केला असता त्यांची बलेनो कारला मागुन रॉकेल टाकुन आगीने पेट घेतल्याचे दिसले. सदरचे दृश्य बघताच क्षणी काही वेळ दोन्ही उभयतांना हा आपल्या बाबतीत काय प्रकार घडतोय हे समजेना असे झाले,तरी काही क्षणात त्यांनी पाण्याच्या भरपुर वापर करुन आग विझवली तरी देखिल कारचे बरेच नुकसान झाले.
दरम्यानच्या घटनेची तक्रार सबंधित फोंडाघाट पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस यांनी घटनेचा पंचनामा करुन तक्रार दाखल करुन घेतली पण नुसती तक्रार घेवुन किंवा पंचनामा करुन यावर समाधान होणार नाही तर संबंधिक कृत्य करणा-या भुरट्या गुंडाना कायमस्वरुपी आळा घालावा, यापुर्वी देखिल गावामध्ये लोकांना धमक्या देणे,बाहेरील गुंड प्रवृत्तीची माणसं आणुन गावातील व्यक्तीना मारझोड करणे,दहशत माजवणे,गाड्याची नासधुस करणे असे प्रकार घडले असुन संपुर्ण गाव दहशतीखाली आहे यावर चाप बसावा म्हणुन आज नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे शिष्टमंडळ पोलीस निरिक्षक कणकवली जिल्हा पोलीस उप अधिक्षक सिंधुदुर्ग यांची भेट घेवुन निवेदने दिली. सदर निवेदनामध्ये नवीन कुर्ली गावामध्ये घडलेल्या मागील घटनाचा उल्लेख केला असुन गुन्हेगारास तात्काळ अटक करुन योग्य ती कारवाई करावी. येत्या ८ ते १० दिवसात गुन्हेगारावर कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे गावातील सर्व ग्रामस्थांच्या समवेत तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उप अधिक्षक श्रीमती गावडे मॅडम यांना भेटलेल्या शिष्टमंडळात मंडळाचे सचिव धीरज हुंबे,रविंद्र नवाळे,हरेश पाटील,अमित दळवी आदी १० ते १५ जण ग्रामस्थ उपस्थित होते.