*कोंकण एक्सप्रेस*
*जेष्ठ पत्रकार दयानंद मांगले यांचे निधन*
*शिरगांव / संतोष साळसकर*
देवगड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा दैनिक रत्नागिरी टाइम्सचे देवगड तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार दयानंद यशवंत मांगले यांचे सोमवारी 13 जुलै रोजी वयाच्या ५८व्या वर्षी चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक, राजकीय आणि विविध स्तरांतील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
दयानंद मांगले यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक वर्षे निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. त्यांचा स्वभाव मनमिळावू, दिलदार आणि सर्वांना आपलेसे करणारा असल्याने त्यांनी समाजात मोठा मित्रपरिवार निर्माण केला होता.

