*कोंकण एक्सप्रेस*
*रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा पदभार समारंभ दिमाखात संपन्न; सुप्रिया नलावडे नूतन अध्यक्ष, तर डॉ. अमेय मराठे सेक्रेटरी*
*कणकवली ः संजना हळदिवे*
रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा वार्षिक पदभार ग्रहण समारंभ नुकताच ‘अलंकार हॉल, जाणवली’ येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यात पार पडला. याप्रसंगी आगामी वर्षासाठी नवनवीन संकल्प करत रोटरीच्या नवीन कार्यकारणीने आपला पदभार स्वीकारला.
कार्यक्रमाची सुरुवात कु. अबीर मराठे याच्या सुमधुर गणेश स्तवन आणि ‘कौशल्याचा राम’ या गीताने झाली. त्यानंतर राज नलावडे यांनी उपस्थितांचे स्वागत करत ‘वेलकम स्पीच’ दिले.
नूतन कार्यकारणी जाहीर
या सोहळ्यात रोटरी क्लब कणकवलीची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली. नवनव्हिाचित अध्यक्ष म्हणून कणकवलीच्या नगरसेविका तथा इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रोफेसर रो. सुप्रिया नलावडे तर सेक्रेटरी म्हणून रो. डॉ. अमेय मराठे यांनी पदभार स्वीकारला.
इतर पदाधिकारी व संचालक मंडळ पुढीलप्रमाणे:
ट्रेझरर: रो. डॉ. प्राजक्ता नाचणे
उपाध्यक्ष: रो. तृप्ती कांबळे
सार्जन एट आर्म: रो. स्नेहलता राणे
क्लब सर्विस डायरेक्टर: रो. मेघा गांगण
व्होकेशनल सर्विस: रो. मोहिनी राठोड
कम्युनिटी सर्विस डायरेक्टर: रो. रवी परब
इंटरनॅशनल सर्व्हिस डायरेक्टर: नितीन बांदेकर
युथ सर्विस डायरेक्टर: रो. डॉ. धनंजय रासम
फॅमिली फेलोशिप डायरेक्टर: रो. महेंद्र मुरकर
क्लब लर्निंग फॅसिलिटेटर: रो. प्रमोद लिमये
एडिटर: रो. अनिल कर्पे
यांच्यासोबतच रो. रमेश मालविया, रो. जीवन रेगे, रो. दीपक अंधारी, रो. दीपक बेलवलकर, रो. समीर नलावडे, रो. वर्षा बांदेकर, रो. सोनू मालविया, रो. संतोष कांबळे, रो. स्मिता पावसकर, रो. डॉ. विद्याधर ताईशेटे, रो. आनंद पोरे, रो. लीना काळसेकर, रो. जगदीश राणे, रो. प्रिती पावसकर, सुहास पावसकर, रो. हेमा तायशेटे, रो. लवू पिळणकर, रो. राजश्री रावराणे, रो. संध्या पोरे, रो. सोम गांगण, रो. वीरेंद्र नाचणे, रो. दिशा अंधारी, रो. भेराराम राठोड, रो. उमा परब, रो. माधवी मुरकर, रो. अंकिता कर्पे, रो. राजेश कदम, रो. डॉ. अश्विनी नवरे आणि रो. डॉ. स्वप्निल राणे यांनाही पदभार देऊन सन्मानित करण्यात आले.
’सर्व्यांसाठी सेवा’ हेच ध्येय: सुप्रिया नलावडे
नूतन अध्यक्ष सुप्रिया नलावडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “सर्वांना सोबत घेऊन ‘सर्व्यांसाठी सेवा’ हे ध्येय वाक्य केंद्रस्थानी ठेवून आम्ही काम करणार आहोत. क्लबमधील प्रत्येक सदस्य हा कुटुंबाचा भाग आहे. आगामी काळात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, महिला व बालकल्याण, युवक विकास आणि सामाजिक जागरूकता या क्षेत्रात विविध उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवेचा स्पर्श पोहोचवणे हेच आमच्या कार्याचे खरे यश असेल.”
मागील वर्षाच्या कार्याचा आढावा
मावळते अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे यांनी आपल्या कालखंडात झालेल्या कामांचा आढावा सादर केला. त्यांच्या कार्यकाळात आर. डी. सी. मीट, आयडियल स्टडी ॲपचे मोफत वाटप, करिअर मार्गदर्शन, ज्येष्ठ नागरिक दिन आणि स्वच्छता मोहीम यांसारखे अनेक कौतुकास्पद उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले.
परिवर्तनाच्या शिल्पकार स्वाती हेरकर यांचे मार्गदर्शन
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून वाई येथील दूरदृष्टी लाभलेल्या नेतृत्व आणि परिवर्तनाच्या शिल्पकार पी. डी. जी. स्वाती हेरकर उपस्थित होत्या. त्यांनी रोटरीच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रोजेक्ट कशा पद्धतीने अधिक प्रभावीपणे राबवता येतील, याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव
रोटरीच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात आला:
कृषी क्षेत्र: संदीप राणे (फोर वे टेस्ट देऊन सन्मान)
हॉटेल व्यवसाय: दत्ता शंकरदास आणि महेश शंकरदास (बिझनेस एक्सप्रेस पुरस्कार)
स्वच्छता दूत (नगरपंचायत): प्रकाश राठोड, विनोद कांबळे, समीर मोरे (व्होकेशनल अवार्ड)
शिक्षण क्षेत्र: सेवाभावी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विजय भोगले गुरुजी (कै. रवींद्रनाथ मुसळे स्मरणार्थ पुरस्कार)
कला क्षेत्र: मूकबधिर असूनही उत्कृष्ट चित्रकारी करणारे स्वप्निल पांडुरंग पाटणकर (व्होकेशनल अवार्ड)
यासोबतच रोटरी परिवारातील शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा (अबीर मराठे, शौर्य नाचणे, आर्या ताईशेटे, नित्यानंद मुरकर, अभिषेक राणे, स्वराली कदम, निर्झरा बांदेकर) सत्कार करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला असिस्टंट गव्हर्नर संजय रावराणे, रो. अभिषेक माने, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली, रो. राजेश घाटवळ, रो. डॉ. विद्याधर तायशेटे, एरिया हेड नीता गोवेकर यांच्यासह देवगड, खारेपाटण, वैभववाडी, मालवण, कुडाळ, ओरस, सावंतवाडी, वेंगुर्ला, शिरोडा आणि बांदा येथून रोटरीचे पदाधिकारी व कणकवलीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन (MOC) रो. राजेश कदम, रो. स्नेहलता राणे आणि रो. मेघा गांगण यांनी केले. शेवटी नूतन सेक्रेटरी रो. डॉ. अमेय मराठे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

