पाककला स्पर्धेत क्षमा कारेकर प्रथम

पाककला स्पर्धेत क्षमा कारेकर प्रथम

*कोंकण एक्सप्रेस*

*पाककला स्पर्धेत क्षमा कारेकर प्रथम*

*संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेला प्रतिसाद*

*कणकवली ः संजना हळदिवे*

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात पालकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यात क्षमा कारेकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. दीपा कलिंगण यांनी द्वितीय तर सई बिडये यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. शरयू शिरवलकर, सुषमा पोटफोडे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.
पाककला स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण निशा केळुसकर यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी नगरसेविका सुमेधा अंधारी, दीपिका जाधव, जाई मुरकर, शीतल मांजरेकर, शीतल सावंत आदी महिला उपस्थित होत्या. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शहर विकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!