जांभवडे पंचक्रोशीतील शिक्षणमहर्षी काळाच्या पडद्याआड

जांभवडे पंचक्रोशीतील शिक्षणमहर्षी काळाच्या पडद्याआड

*कोकण  Express*

*जांभवडे पंचक्रोशीतील शिक्षणमहर्षी काळाच्या पडद्याआड*

*कणकवली ः प्रतिनिधी*

जांभवडे पंचक्रोशीत ६०वर्षापुर्वी शिक्षणगंगा आणण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करणारे आणि जांभवडे पंचक्रोशीला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी पदरमोड करुन गावा-गावात फिरुन न्यु शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज जांभवडेच्या माध्यमातून तळागाळातील तत्कालीन गरिब शेतकऱ्यांचा मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणारे कुपवडे फौजदारी येथील सामाजिक,शैक्षणिक कार्यकर्ते,उच्च शिक्षित सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक कै.शांताराम सीताराम परब गुरुजी यांचे आज अल्प आजाराने दु:खद निधन झाले.त्यांच्या निधनाने जांभवडे पंचक्रोशीतीचे सामाजिक आणि शैक्षणिक नुकसान झाले आहे.त्यांच्या निधनाची बातमी समजताच कुपवडेसह जांभवडे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.परब गुरुजींचा जांभवडे हायस्कूलच्या उभारणीत सिंहाचा वाटा होता.साठ वर्षांपूर्वी कोणत्याही सुविधा उपलब्ध नसतात अनेक वर्षे जांभवडे पंचक्रोशी शिक्षण समिती या संस्थेचे सचिवपद सांभाळून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली होती.विविध सामाजिक, सांस्कृतिक व पंचक्रोशीवाशीयांच्या वैयक्तिक कार्यक्रमात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा.गेल्या आठवड्यात जांभवडे पंचक्रोशीतील लोकसहभागातून उपलब्ध केलेल्या अॅम्बुलन्सच्या लोकार्पण सोहळ्यात मुसळधार पावसातही गुरुजींनी हजेरी लावलेली होती.तो कार्यक्रम या समाजसेवकांचा अखेरचा कार्यक्रम ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!