आधार सेवा केंद्र तळेरे नागरिकांच्या सेवेला रुजू.

आधार सेवा केंद्र तळेरे नागरिकांच्या सेवेला रुजू.

 *कोकण  Express*

*आधार सेवा केंद्र तळेरे नागरिकांच्या सेवेला रुजू…*

*आधार केंद्र चालक श्री. सुहास बिडये*

*कणकवली:- संजना हळदिवे*

तळेरे ग्रामपंचायत येथे आज आधार केंद्र सुरु करण्यात आले. तळेरे गावाचे सरपंच सौ.साक्षी सुर्वे यांच्या हस्ते आधार केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच दिनेश मुद्रस, सदस्य स्वप्निल वनकर, ग्रामसेवक युवराज बोराडे, राजेश जाधव, रवींद्र भोगले, आधार केंद्र चालक श्री. सुहास बिडये तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


आधार कार्ड नुतणीकरण करणे तसेच बदल करणे यासाठी ग्रामस्थांना कणकवली सेंटरला जावे लागत होते. आता तळेरे ग्रामपंचायत मध्ये सेंटर झाल्याने ग्रामस्थांच्या सोयीचे झाले आहे.
सरपंच सौ. साक्षी सुर्वे यांनी श्री.सुहास बिडये यांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!