सदस्य फोडण्यासाठी २५ लाख वाटणाऱ्यांनी आम्हाला समाजकार्यात तरी पराभूत करून दाखवावे

सदस्य फोडण्यासाठी २५ लाख वाटणाऱ्यांनी आम्हाला समाजकार्यात तरी पराभूत करून दाखवावे

*कोकण Express*

*सदस्य फोडण्यासाठी २५ लाख वाटणाऱ्यांनी
आम्हाला समाजकार्यात तरी पराभूत करून दाखवावे*

*आमदार नितेश राणे यांचे सेना नेत्यांना आव्हान

*कोव्हीड लक्षणे असल्याने होतो क्वारंटाईन*

*ट्विट करून जेवढी कामे करतो त्याच्या १ टक्का काम विरोधकांनी करावे*

*आमदार नितेश राणे यांनी सेनेला घेतले फैलावर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

ट्विट करून जेवढी कामे मी करतो त्याच्या १ टक्का तरी कामे राणे विरोधकांनी करून दाखवावीत.मी निवडणूक कधी पराभूत झालो नाही मात्र मदत कार्यात तरी माझ्या पेक्षा जास्त मदत जनतेला करून पराभूत करण्याची हिंमत दाखवा.जिल्हा परिषदेचे सदस्य फोडण्यासाठी शिवसेना प्रत्येकाला २५ लाख वाटत होती मात्र जनतेला सेवा देण्यासाठी, ऑक्सिजन पुरविण्यासाठी तो पैसा देत नाही.निदान शासनाकडून तरी आणून द्या अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.
तौक्ती वादळानंतर आमदार नितेश राणे यांनी निसर्ग वादळातील नुकसानभरपाई बाबत सिंधुदुर्गवासियांची ठाकरे सरकारने केलेल्या फसवणुकीबद्दल ट्विट केले होते. यावरून आमदार नितेश राणे यांना सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. त्यांचा समाचार घेत मी कोव्हीड वॅक्सिन घेतल्यामुळे मला कोव्हीडसदृश्य लक्षणे दिसत होती. त्यामुळे मी सेल्फ क्वारंटाईन होतो. आमदार असलो तरी मी एक मुलगा आहे, बाप आहे. कोव्हीड ची लक्षणे असताना मी जर जनतेत मिसळलो तर माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला आणि जनतेलाही त्रास झाला असता. त्यामुळे मी माझ्या सर्व टेस्ट करून आज सिंधुदुर्गात येत आहे. ट्विट करून जेवढी कामे मी करतो त्याच्या 1 टक्का तरी कामे विरोधकांनी करून दाखवावीत अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी ट्रोल करणाऱ्यांना झापले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!