*कोंकण एक्सप्रेस*
*टेनिस क्रिकेटमध्ये फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांची भरारी!*
*शुभम सावंत व जतिन हिर्लेकर यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
टेनिस क्रिकेट वेल्फेअर असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग व टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे १७ वर्षांखालील विद्यार्थ्यांची निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीत न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटचे शुभम मंगेश सावंत व जतिन संतोष हिर्लेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राहुरी, जि. अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ही निवड मिळवत प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा पुढे नेली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशालेत त्यांचा तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक मा. श्री. संदेश सावंत-पाटील व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रसाद पारकर यांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी पर्यवेक्षक श्री. राठोड सर, श्री. जोईल सर, श्री. घुंगरड सर, श्री. गांगुर्डे सर, श्री. गोसावी सर तसेच शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांनी शुभम सावंत व जतिन हिर्लेकर यांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

