परुळेबाजार सरपंच श्वेता सुनिल चव्हाण यांना पुत्र शोक

परुळेबाजार सरपंच श्वेता सुनिल चव्हाण यांना पुत्र शोक

*कोकण Express*

*परुळेबाजार सरपंच श्वेता सुनिल चव्हाण यांना पुत्र शोक…*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार ग्रामपांचत सरपंच सौ. श्वेता सुनील चव्हाण आणि भाजपा परुळे शक्ती केंद्र प्रमुख श्री सुनील चव्हाण यांचा एकुलता एक 15 वर्षीय मुलगा वेदांत याचे काल मंगळवारी 18 मे रोजी सकाळी दुःखद निधन झाले. या दुर्घटनेने चव्हाण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वेदांत सुनिल चव्हाण (वय 15) याचे दुदैवी निधन काल त्याच्या वाढदिवसाच्याच दिवशी झाल. घरासमोर पाय घसरुन तोल जाऊन पडल्याने वेदांत याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यात त्याचे निधन झाले. अण्णासाहेब विद्यामंदिर परुळे या शाळेत वेदांत शिक्षण घेत होता. या दुर्घटनेमुळे परुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!