*कोकण Express*
*विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर…*
*सिंधुदुर्गनगरी,ता.१९:*
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर २१ मे रोजी विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण कोकण दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी रत्नागिरी,रायगड व सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामध्ये ते नुकसानीची पाहणी करणार आहेत,अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.

