ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना

*कोंकण एक्सप्रेस*

*ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना*

*सुनिल भोगटे आणि समिल जळवी यांनी मानले केंद्र शासनाचे आभार..*

*अखेर मागणीला यश ;जातनिहाय जनगणना व्हावी केली होती मागणी..*

*सिंधुदुर्ग : संजना हळदिवे*

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी जातनिहाय जनगणना केल्यामुळे सुसूत्रता येईल असे ओबीसी नेते तथा वैशवाणी समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री.सुनिल भोगटे आणि भंडारी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.समिल जळवी यांनी यांनी शासनाने जेव्हा १में. पासुन जनगणना सुरु केली तेव्हा जनगणने चे स्वागत करत एक खंत वेक्त केली होती आणि त्यावर आवाज देखील उठवीला होता.ती म्हणजे “जनगणना जातनिहाय व्हावी “…अखेर या मागणीला आता यश मिळाले असुन केंद्र सरकार ने आता ओबीसी समाजासमोर झुकावे लागले आहे.ओबीसींची जातनिहाय जनगणना होण्यासाठी ४० प्रश्नावली तयार करण्यात आली असून त्यात १०व्या प्रश्नांत ओबीसींचा मुद्दा घेण्यात आलेला आहे.त्यामुळे ओबीसी समाजासाठी ही खूप आनंदाची आणि महत्त्वाची बाब आहे.यासाठी ओबीसी च्या वतीने श्री.सुनिल भोगटे,श्री.समिल जळवी यांनी ओबीसी आणि ओबीसी कार्यकारणी च्या माध्यमातून तहसीलदार कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय अन्य शासन दरबारी पत्रव्यवहार करत ठीक, ठिकाणी निवेदन देत ओबीसी च्या वतीने शासनाचे लक्ष, वेधले होते.आणि पत्रकार परिषद घेऊन विविध माध्यमातून ओबीसी समाजाला जातनिहायक जनगणना करावी अशी आग्रहाची मागणी केली होती.आता या मागणीला यश मिळाल्याने श्री.सुनिल भोगटे आणि श्री.समिल जळवी यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!