*कोकण Express*
*रमजान ईदची नमाज समस्त मुस्लिम बांधवांनी घरीच राहून करावी साजरी*
*शासनाचे नियम पाळून करावे सहकार्य; अल्लाउद्दीन खुल्ली*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समस्त जनता हैराण झाली आहे, आणि त्यातच चालू असलेला मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना म्हणून ओळखला जाणारा रमजान आज शेवटचा उपवास आहे जसा एक महिना मुस्लिम बांधवांनी घरात राहून साजरा केला आहे. तसेच सहेरी, अपतारी हे सर्व मुस्लिम बांधवांनी घरातच राहून केले आहे. मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो, जसे आपण एक महिना घरात राहून नमाज, रोजा केलात तेसंच रमजान ईदची नमाज घरीच राहून साजरी करावी तेसच शासनाचे नियम पाळून सहकार्य करावे.

