पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार फोंडाघाट प्रा. आ. केंद्रात रुग्णवाहिका सेवेत दाखल

पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार फोंडाघाट प्रा. आ. केंद्रात रुग्णवाहिका सेवेत दाखल

*कोकण Express*

*पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार फोंडाघाट प्रा. आ. केंद्रात रुग्णवाहिका सेवेत दाखल*

*जि. प. सदस्य संजय आग्रे यांनी केली होती आग्रही मागणी; खनिकर्म विकास निधीतून मंजुरी*

जिल्हा खनिकर्मच्या निधीतून सिंधुदुर्गात बारा रुग्णवाहिका देण्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी जाहीर केले होते. यात फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिका मंजूर केल्याबद्दल फोंडाघाट दशक्रोशीत आनंद व्यक्त केला जात आहे. याबाबत युवासेना फोंडा विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी जि. प. तथा रुग्णकल्याण समिती अध्यक्ष श्री. संजयजी आग्रे व पालकमंत्री ना. उदयजी सामंत साहेब यांचे विभागातील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.
फोंडाघाट जि.प.सदस्य तथा रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष मा.संजय आग्रे यांनी पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्याकडे आग्रही मागणी केली होती.फोंडाघाट ही जिल्ह्यातील एक प्रमुख बाजारपेठ असल्याने.. तसेच देवगड- फोंडा- कोल्हापूर- निपाणी मार्गावरील प्रमुख केंद्र असल्याने आज वाढत्या रुग्ण संख्येसाठी रुग्णवाहिकेची गरज होती.. आज पालकमंत्री महोदयांनी जि.प.सदस्य संजय आग्रे यांच्या मागणीनुसार रुग्णवाहिका तात्काळ मंजूर केल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. सदर रुग्णवाहिका आज जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून फोंडाघाट आरोग्यकेंद्रात दाखल झाली असून रुग्णकल्याण समिती अध्यक्ष श्री. संजय संजय आग्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रुग्णसेवेत दाखल करण्यात आली. यावेळी माजी सभापती संदेश पटेल, वैद्यकीय अधिकारी डॉ जंगम, फोंडा शहरप्रमुख सुरेश टक्के, युवासेना शहरप्रमुख बंटी उरणकर, अविनाश सापळे, केदार रेवडेकर, राजू पटेल, श्याम भोवड, राजन नानचे, पिंटू पटेल, महिला आघाडीच्या सौ. माधवी दळवी, सौ. संजना हळदिवे, डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी आदिजण उपस्थित होते.
संजय आग्रे यांनी गेल्या वर्षी याच दरम्यान कोरोना काळात फोंडाघाट पंचक्रोशीत अडकलेल्या परजिल्ह्यातील कामगारांना धान्य वाटप केले होते.. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन काम करणाऱ्या आग्रे साहेबांचे यानिमित्ताने दशक्रोशीत कौतुक केले जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!