*कोकण Express*
*सकाळचे बातमी अपडेट / १२ मे बुधवार*
◾ केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी झायडस कॅडिल कंपनीच्या – Virafin या औषधाला मंजुरी दिली होती – या औषधामुळे कोरोना रुग्ण सात दिवसात बरा होतो –
◾ असे कंपनीचा दावा आहे – तर काल कंपनीने या औषधाची किंमत जारी केली – त्यानुसार विराफिनच्या एका डोसची किंमत 11 हजार 995 रुपये असेल
◾ मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान ईदच्या अनुषंगाने – गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी झाल्या – त्यानुसार इफ्तारसाठी मशिदीमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नका – असे सांगण्यात आले आहे
◾ सोना कॉमस्टार हि ऑटो पार्ट्स बनवणारी – देशातील सर्वात मोठी कंपनी – सहा हजार कोटी रुपयांच्या IPO आणणार आहे – कॅपिटल मार्केट रेग्युलेटरकडून मान्यता मिळाली आहे
◾ मराठा समाजाला राज्य सरकारच्या अधिकारात असलेल्या सवलती तातडीने लागू करा – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी
◾ मुथुट फायनान्सने कंपनी नीरा अॅपशी करार केला – त्यानुसार देशातील 12 हजार पगार घेणार्या ग्राहकांना – एक लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येणार आहे
◾ हे कर्ज मुथुट फायनान्सच्या माध्यमातून मिळत आहे – तर कर्जासाठी अर्ज हा नीरा अॅपद्वारे करावा लागेल – प्ले स्टोअर वर हे अॅप उपल्बध आहे
◾ केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार – पंतप्रधान 14 मे रोजी म्हणजेच शुक्रवारी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांशी चर्चा करतील – आणि ते पंतप्रधान किसान योजनेंतर्गत पुढचा हफ्ता जाहीर करतील
◾ अरबी समुद्रात येत्या आठवड्यात मोठे चक्रीवादळ धडकणार – असा इशारा हवामान विभागानं दिला आहे – म्यानमारने या चक्रीवादळाला टाँकटाइ असं नाव दिलं आहे –
◾ तर आपल्या देशातील पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख राज्य – म्हणजे महाराष्ट्र, केरळ तसेच गुजरातला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

