सत्ताधाऱ्यांनी ‘टेंडर टेंडर’ न खेळता आधी रुग्णांना आॕक्सिजन, व्हेंटिलेटर पुरवा

सत्ताधाऱ्यांनी ‘टेंडर टेंडर’ न खेळता आधी रुग्णांना आॕक्सिजन, व्हेंटिलेटर पुरवा

*कोकण  Express*

*सत्ताधाऱ्यांनी ‘टेंडर टेंडर’ न खेळता आधी रुग्णांना आॕक्सिजन, व्हेंटिलेटर पुरवा*

*भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार*

*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*

सध्या राज्यभरासह जिल्ह्यातही परिस्थिती अगदी नाजूक आहे. पण मावळलेला दिवस पुन्हा उगवतोच. तसेच हेही दिवस जातील. त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी ‘टेंडर टेंडर’ न खेळता आधी रुग्णांना आॕक्सिजन, व्हेंटिलेटर पुरवा. पालकमंत्री उदय सामंत व सत्ताधारी आमदार महोदयांना फोन करून मी विनंती केली आहे, की थोडे उदार व्हा. मागेल त्याला आॕक्सिजन व व्हेंटिलेटर देण्याचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत थांबू नका. टेंडर प्रक्रियेत अडकलेल्या प्रशासनाला धाकात ठेवा.’ असा विनंतीवजा टोला भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी पालकमंत्र्यांना लगावला आहे.

‘सध्या जिल्ह्यात आॕक्सिजन आणि व्हेंटिलेटर अभावी लोक तडफडून मरत आहेत. त्यांना जर वेळीच आपण व्हेंटिलेटर, इंजेक्शन, आॕक्सिजन देऊ शकलो नाही, तर सत्ता असून उपयोग काय? राज्य कशासाठी व कोणासाठी करायचे? परिस्थितीचे गांभीर्य ओळखा. किमान तिसरी लाट येण्यापुर्वी तरी व्यवस्था पुर्ण करा. विरोधी पक्षात राहून आमदार नितेश राणे स्वतःच्या पैशाने व्यवस्थेसाठी धडपडतात. पण सत्ताधाऱ्यांना तर सरकारच्या पैशाने पण का नाही आरोग्य व्यवस्था उभी करता येत ?’ असा सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

‘अजुनही वेळ गेलेली नाही. युद्ध पातळीवर काम करा आणि खड्डयात घाला तुमची टेंडर पद्धत. करोना गेल्यावर तुमच्या टेंडरचं काय ते बघा. आधी ॲाक्सीजन , व्हेंटीलेटर, रेमेडीसीवीर विकत घ्या. रुग्णांचे प्राण वाचवणं तुमच्या टेंडर प्रक्रियेपेक्षा महत्त्वाचं आहे, असा विनंतीवजा टोला त्यांनी पालकमंत्र्यांसोबत सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!