महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीने खून केला; आमदार नितेश राणे

महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीने खून केला; आमदार नितेश राणे

*कोकण  Express*

*महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीने खून केला; आमदार नितेश राणे*

कणकवली ः प्रतिनिधी ( संजना हळदिवे )

मराठा आरक्षण न्यायालयात रद्द होणे म्हणजे, महाराष्ट्रच्या महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीने केलेला खून आहे .अशी संतप्त टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

ठाकरे सरकार न्यायालयात मराठ्यांची बाजू मांडण्यासाठी अपयशी ठरले, कोणतेही नियोजन केले नाही. फक्त नाटक आणि ढोंगीपणा केला. आता तोंड वाजवून नाही तर तोंडात वाजवूनच न्याय मिळेल असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी मराठा समाजाला केले आहे.

आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षण रद्द होताच ट्विट करून आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले,
“या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीने खून केला आहे! सरकार आल्यापासून ही ठरवून केलेली हत्या आहे, कसली तयारी नाही, फक्त नाटक आणि ढोंगीपणा, शेवटी छ. शिवाजी महाराजांनी जे शिकवून ठेवले आहे. तोंड वाजवून न्याय भेटत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!