*कोंकण एक्सप्रेस*
*आम.दीपक केसरकर यांनी आरोग्य मंत्री नाम. श्री. प्रकाश आबिटकर यांची त्यांच्या सुरुची या निवासस्थानी घेतली भेट*
*सावंतवाडी मतदार संघातील आरोग्य विषयक बाबींवर चर्चा*
*मुंबई*
आमदार दीपक केसरकर यांनी आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री नामदार श्री. प्रकाश आबिटकर यांची त्यांच्या सुरुची या निवासस्थानी भेट घेऊन मतदार संघातील आरोग्य विषयक बाबींवर चर्चा केली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व इतर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पदे (डॉक्टर ) मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. सदरची पदे तातडीने भरण्यासंदर्भात आग्रही मागणी केली. तसेच उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे डायलिसिस यंत्र उपलब्ध करून देणे बाबत आग्रही मागणी केली.
मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रिक्त सर्व पदे लवकरात लवकर भरण्यात येतील व डायलिसिस यंत्रणा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले.
तसेच उपजिल्हा रुग्णालय जागेचा प्रश्न आता मिटला असून उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम लवकरात लवकर होण्यासाठी पुढील आवश्यक ती कार्यवाही विभागाकडून लवकरात लवकर होणे बाबत विनंती केली. भेटीच्या वेळी सोबत शिवसेना जिल्हा समन्वयक सिंधुदुर्ग श्री. सचिन वालावलकर उपस्थित होते.

