*कोंकण एक्सप्रेस*
*ऑनलाइन अभंग-भक्तीगीत स्पर्धेचा निकाल जाहीर*
*दीक्षित फाउंडेशनतर्फे ‘श्रीधर कृष्ण दीक्षित स्मृती स्पर्धा*
*देवगड ः प्रतिनिधी*
समाजात भक्तिसंगीताची आवड वाढीस लागावी आणि संतपरंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने दीक्षित फाउंडेशनतर्फे आषाढी एकादशीनिमित्त ‘श्रीधर कृष्ण दीक्षित स्मृती ऑनलाइन अभंग भक्तीगीत गायन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विठ्ठलावर आधारित अभंग व भक्तिगीतांच्या व्हिडिओद्वारे विविध वयोगटांतील नवोदित व प्रस्थापित गायकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वरशुद्धता, ताल, भावाभिव्यक्ती आणि सादरीकरण या निकषांवर स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे:
१२ वर्षांपर्यंत: प्रथम – स्वरा शिरोडकर (गोवा), द्वितीय – श्रावणी मेस्त्री (सावंतवाडी), तृतीय – सौम्या बाबधनकर (राजापूर), उत्तेजनार्थ – ऋत्वी काळेकर (देवगड).
१२ ते २५ वर्षे: प्रथम – चिन्मयी कुलकर्णी (गुहागर), द्वितीय – सृष्टी तांबे (चिपळूण), तृतीय – चिन्मयी मेस्त्री (सावंतवाडी), उत्तेजनार्थ – उत्तरा केळकर (राजापूर) व भाविक मेस्त्री (कुडाळ).
२५ ते ५० वर्षे: प्रथम – यशश्री करंदीकर (डोंबिवली), द्वितीय – समीक्षा जोशी (पुणे), तृतीय – सुजित फडके (देवगड), उत्तेजनार्थ – मुक्ता दाबके (दापोली).
५० वर्षांपुढे: प्रथम – अदिती गोडबोले (पुणे), द्वितीय – श्रीनिवास केळकर (राजापूर), तृतीय – चित्रा जोशी (बेळगाव), उत्तेजनार्थ – संजय शिंदे (चिपळूण).
प्रत्येक गटातील पहिल्या चार विजेत्यांना अनुक्रमे ₹२१००, ₹१५००, ₹११०० आणि ₹७५० ची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. स्पर्धेचे आयोजन प्रियांका वेलणकर, हर्षद जोशी, सर्वेश बापट, संदीप फडके, मानसी बापट आणि विश्वास वेलणकर यांनी केले.

