*कोंकण एक्सप्रेस*
*वैभववाडीत जनशताब्दी एक्सप्रेस आणि नेत्रावती एक्सप्रेस या दोन्ही महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा*
*पं.स. सभापती सिद्धेश रावराणे यांची मागणी*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
कोकणच्या भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे आणि मत्स्य व्यवसाय व बदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमध्ये नेते झाले. यांच्या विशेष प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसटी ते सावंतवाडी ही नवीन रेल्वे सेवा सिंधुदुर्गातील प्रवाशांसाठी लवकरच सुरू होणार आहे. या रेल्वेला थांबा देण्यात आल्याने तालुक्यातील प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. या महत्वपूर्ण सेवेसाठी खासदार नारायण राणे व नामदार नितेश राणे यांचे वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी आभार मानले अशी त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून माहिती दिली.
दरम्यान, वैभववाडी येथे जनशताब्दी एक्सप्रेस आणि नेत्रावती एक्सप्रेस या दोन्ही महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी ही करण्यात आली आहे. या गाड्यांना थांबा मिळाल्यास मुंबई कोकण तसेच इतर भागात प्रवास करणाऱ्या तालुक्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. जनतेच्या सुविधासाठी प्रत्यक्ष पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणे महत्त्वाचे आहे. केवळ सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा करून शेअर घेणे योग्य नसते, त्यांनी स्पष्ट केले. वैभववाडी तालुक्यातील प्रवाशांच्या वतीने रेल्वे सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे पंचायत समिती सभापती सिद्धेश रावल यांनी प्रसिद्धी पत्रकातून आभार व्यक्त केले.

