*कोंकण एक्सप्रेस*
*त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे एन डी आर एफ ने दिले आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण*
*प्रशिक्षणात विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग*
*मालवण ः प्रतिनिधी*
त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचालित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय ,शिरवंडे ता.मालवण येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ)पुणे यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय समिती अध्यक्ष श्री.दशरथ घाडीगांवकर यांच्या उपस्थितीत इन्स्पेक्टर मा.श्री.वृषभ शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे यांनी करताना या मार्गदर्शनाचे आणि प्रात्यक्षिकाचे महत्त्व स्पष्ट केले.यावेळी इन्स्पेक्टर श्री.वृषभ शर्मा यांनी आपत्ती व्यवस्थापन बाबत सखोल मार्गदर्शन केले.तसेच कोण कोणत्या प्रकारच्या आपत्ती आहेत आणि विविध आपत्ती प्रसंगी कोणत्या उपाययोजना कराव्यात आणि कोणती काळजी घ्यावी आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्य कसे करावे, भूकंप,पूर,आग, सर्प दंश, तसेच नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी कोणती दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत जखमी व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर कसे काढावे, प्राथमिक उपचार कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी श्री.वृषभ शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन संदर्भातची विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना करुन दाखवली.आपत्तीच्या वेळी कशाप्रकारे बचावकार्य करावे, स्वतः ची आणि बाधितांची कशी सुरक्षितता करावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अनेक विद्यार्थ्यांनी या प्रात्यक्षिकांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.आपत्तीच्या प्रसंगी कशी काळजी घ्यावी, कशी सज्जता,सतर्क दाखवावी,कोणती कृती करावी , प्रसंगावधान कसे राखावे याचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले.हा कार्यक्रम विद्यार्थी आणि उपस्थितांना अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरला.
यावेळी एन डी आर एफ इन्स्पेक्टर श्री.वृषभ शर्मा यांच्या समवेत हवालदार श्री.विष्णु घुले, श्री.एन व्ही सुरेश, श्री.शरयू साळुंखे, श्री.अनिकेत सुर्यवंशी, श्री.शुभम कदम, श्री.प्रकाश गावडे, श्री.राजन नंदी यांनी मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्री दशरथ घाडीगांवकर, शालेय समिती सदस्य श्री.कैलास घाडीगांवकर,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ.प्राजक्ता लुडबे, श्री.प्रदिप घाडीगांवकर, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते*

