*कोंकण एक्सप्रेस*
*हळवळ गावातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ*
*कणकवली : प्रतिनिधी*
श्रीराम सेवा मंडळ मुंबई (हळवल) यांच्या वतीने, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर परीक्षा तसेच इंजिनीअरिंग, गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा आणि कला, क्रीडा, सांस्कृतिक व इतर क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या हळवळ गावातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ आज दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीराम मंदिर, हळवल येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी 45 गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना पुढील वाटचालीसाठी मंडळाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी JEE MAIN या प्रवेश परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल कुमार जय मुकुंद राणे याचा सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मंडळाचे संस्थापक सचिव चंद्रकांत राणे होते तसेच या कार्यक्रमास कणकवली पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे,गावच्या सरपंच चव्हाण मॅडम, मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष श्री अनिल राणे, मुंबई मंडळाचे जेष्ठ सदस्य श्री ज्ञानदेव राणे, विठोबा राणे, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण राणे स्थानिक मंडळाचे जेष्ठ सदस्य भास्कर राणे,तातू राणे, शशी राणे, शामसुंदर राणे रमेश राणे, प्रभाकर राणे,नामदेव राणे, डॉक्टर दिलीप घाडी, ॲडव्होकेट शंकर राणे, रघुनाथ कुबल मारुती सावंत, एकनाथ राणे ग्रामपंचायत सदस्य सचिन ठाकूर, समर्थ राणे, संदीप राणे, प्रदीप राणे, ग्रामपंचायत सदस्य सौ. परब मॅडम इत्यादी व श्रीराम सेवा मंडळ मुंबई व स्थानिक चे सदस्य व गावातील प्रतिष्ठित मान्यवर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी श्री ज्ञानदेव राणे, लक्ष्मण गावडे,श्री तांबे सर,अनिल राणे यांनी मनोगत व्यक्त केले.या गुणगौरव समारंभाला समारंभाला मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश राणे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शामसुंदर राणे यांनी केले आभार श्री शंकर राणे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी साठी विक्रम राणे, मयूर राणे, मंदार राणे, गजानन राणे, प्रशांत राणे, गजानन राणे,बापू पाटकर, अनिकेतन राणे, विघ्नेश राणे यांनी विशेष मेहनत घेतली.

