*कोंकण एक्सप्रेस*
*रेडी गावात “नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान” अंतर्गत मोफत चष्मा वाटप*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
“नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान” हे भाजपच्या सेवा पंधरवडा निमित्त मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मा.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सप्टेंबर २०२५ च्या महिन्यात रेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये नेत्र पेढी जिल्हा रुग्णालय ओरोस व रेडी जि.प.भाजप यांच्या संयुक्त विदयमाने नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप असे शिबिर घेण्यात आले.
या शिबिराच्या लाभार्थीचे चष्मे प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे उपलब्ध झाल्यानंतर आज ४ आँगस्ट २०२६ रोजी रेडी भाजपच्या वतीने रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र च्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले.

या चष्मा वाटप कार्यक्रमावेळी एस्.एस्.पी मेडिकल काॅलेज ओरोस यांच्या अधिकारी यांनी वेंगुर्ला येथे होणा-या आरोग्य शिबिराची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाजप तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे यांनी केले त्याच प्रमाणे “नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान” या संदर्भात तालुकाध्यक्ष विष्णू परब व जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा परिषद आरोग्य,शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी केले.
या वेळी मान्यवर म्हणून वेंगुर्ला खरेदी विक्री संघाचे चेअरमन केळजी,पाल अणसूरचे भाजप पदाधिकारी कमलेश गावडे,रेडी सरपंच रामसिंग राणे,माजी उपसरपंच रेडी विदयमान सदस्य सौ.नमिता नागोळकर,जिल्हा मच्छीमार सेल प्रमुख वसंत तांडेल,रेडी शक्ती केंद्र प्रमुख जगन्नाथ राणे,शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे,रेडी गाव अध्यक्ष भाजप ज्ञानेश्वर केरकर,रेडी ८७ बूथ अध्यक्ष अरुण राणे,शिरोडा भाजप युवा नेतृत्व संतोष धानजी उपस्थित होते.

