*कोंकण एक्सप्रेस*
*साळशी शाळेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश*
*सामाजिक वनीकरण अभियानांतर्गत वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न*
*शिरगाव : संतोष साळसकर*
पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजावी आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने सामाजिक वनीकरण अभियानांतर्गत माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे वनमहोत्सवानिमित्त वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय गणेश मराठे, वनपाल बी. एस. यादव व वनरक्षक ए. एम. कोळेकर यांच्या हस्ते शाळा परिसरात विविध वृक्षांची रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वनपाल बी. एस. यादव, वनरक्षक ए. एम. कोळेकर तसेच मुख्याध्यापक संजय गणेश मराठे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व, पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन तसेच लावलेल्या रोपांच्या संगोपनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश कृतीतून अंगीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण झाली असून शाळा परिसर अधिक हिरवागार करण्यास हातभार लागला.
या उपक्रमात सहाय्यक शिक्षक पुरुषोत्तम साटम, कनिष्ठ लिपीक स्वप्नील भरणकर, शिपाई सदाशिव भिसे, पालक प्रदीप घाडी तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक पुरुषोत्तम साटम यांनी केले.

