विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

*कोंकण एक्सप्रेस*

*विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश*

*शिरगाव :संतोष साळसकर*

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा’ मध्ये पेंढरी ग्रामविकास मंडळ संचलित पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय, पेंढरी येथील विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
तालुका स्तरावरील गुणवत्तेनुसार अस्मि शिवाजी गुरव, प्राप्ती संजय सोमले आणि दिव्या नारायण तांबे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. चैतन्य अजय गिरकर याने द्वितीय, तर रिया अशोक तांबे हिने तृतीय क्रमांक मिळवून विद्यालयाच्या यशात भर घातली.
या सर्व विद्यार्थ्यांना श्री. गणेश ढेकळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती साठे, निवासी जिल्हाधिकारी श्री. मच्छिंद्र सुकटे तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक श्री. गणेश ढेकळे यांचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव व कार्यकारिणी पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि हितचिंतक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!