*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला ते कालवी श्रीकृष्ण पायीवारी २५ रोजी*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
सर्व वारकरी, भाविक आणि विठ्ठल भक्तांच्या सहभागातील श्रीकृष्ण पायी वारी शनिवार दि.२५ जुलै रोजी सकाळी ७ वा. वेंगुर्ला शहरातील दाभोली नाका येथून निघून केळुस-कालवी बंदर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाणार आहे. या वारीचे नियोजन “माझा वेंगुर्ला” तर्फे केले आहे. वैकुंठवासी श्रीकृष्ण उर्फ बाबू झांटये यांच्या प्रेरणेने सुरू झालेली विठूरायाची ही पायी वारी यंदा सातव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यावर्षीच्या या वारीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन माझा वेंगुर्लातर्फे केले आहे.

