कणकवली शहराचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांची सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर घेतली भेट

कणकवली शहराचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांची सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर घेतली भेट

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली शहराचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांची सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर घेतली भेट*

*व्यावसायिक राजु म्हापसेकर,अनिल मेस्त्री यांच्या उपस्थितीत इमारती संदर्भात सविस्तर चर्चा *

*कणकवली : प्रतिनिधी*

आज दिनांक 17//07/2026 रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायती च्या मालकी च्या जागेतील जेष्ठ व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी इमारती मधील व्यावसायिक श्री अनिल मेस्त्री यांच्या समवेत भेट घेतली,

*यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर, अनिल मेस्त्री, राजु म्हापसेकर यांनी इमारती संदर्भात सविस्तर चर्चा सुध्दा केली, आणि इमारती व जागे संदर्भात नगराध्यक्ष, उप नगराध्यक्ष सविस्तर माहिती जाणून घेतली,

*यावेळी मागिल भेटी दरम्यान सांगितले प्रमाणे इमारती मधील, तसेच सर्व खोके धारकांची तपशीलवार माहिती सादर करण्यात आली,

*यावेळी नगराध्यक्ष संदेश जी पारकर साहेब, उप नगराध्यक्ष नाईक साहेब यांना सर्व व्यावसायिकांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ💐 देऊन पुढील वाटचाली करीता शुभेच्छा देण्यात आल्या,

*त्यावेळच्या निवेदनात असे म्हटले आहे, की

*कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे असलेले नगरपंचायत मालकीचे व्यापारी मार्केट ( पुर्वी चे भाजी मार्केट) मधील स्लॅब ची इमारत पूर्णतः कोसळण्याच्या मार्गावर असून, पहिल्या मजल्यावरील भिंती, छप्पर सुध्दा कोसळून पडले आहे,

*तसेच एका बाजूने स्लॅब सुध्दा कोसळला असून, इमारत धोकादायक बनली आहे, या मध्ये एकुण 13 + पहिल्या मजल्यावर 3 + 1 पत्रा शेड असे एकूण 17 गाळे धारक आहेत,

त्याचप्रमाणे 36 खोके धारक असून या सर्वांची नगरपंचायत मध्ये नोंद असून सर्व वेळोवेळी भाडे भरणा करत आहेत,

त्याचप्रमाणे 10/15 वर्षे येथील गाळे भाड्याने घेऊन, जे 15/16 व्यवसाय करत आहेत , त्यांचा ही विचार केला जावा तरी आपणास विनंती आहे की आपण प्रत्यक्षात पाहणी करावी,

*लवकरात लवकर या जागेवर नवीन व्यापारी संकुलण उभारणी करावे, आणि आम्हाला नवीन व्यापारी संकुलना मध्ये समाविष्ट करून घ्यावे, ही नम्र विनंती आहे,

*या निवेदनात असे हि नमूद केले आहे की, आम्ही नवीन होणाऱ्या संकुलात, नवीन नियमानुसार आवश्यक अनामत रक्कम, नव्याने लागू होणारे भाडे भरण्यास तयार आहोत,

*आपल्या व्यस्त शेड्यूल मधून नगराध्यक्ष संदेश जी पारकर साहेब, उप नगराध्यक्ष सुशांत नाईक साहेब यांनी भेटी करीता वेळ दिल्याबद्दल, तसेच सविस्तर माहिती जाणून घेतल्याबद्दल श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आणि उपस्थितीत सर्व व्यावसायिकांनी आभार व्यक्त केले आहेत,
* यावेळी उपस्थित राजेंद्र मनोहर पेडणेकर, राजु म्हापसेकर,अनिल मेस्त्री, दत्तप्रसाद बिडये ,संतोष महाजन, अविनाश गावडे, बाबूराव घाडिगावकर, प्रभाकर कदम,सईद नाईक, प्रसाद पाताडे, जमिल कुरेशी, शाम सुर्यवंशी, योगेश पवार, बंडू कोदे,शेखर बाणे, महेश वायंगणकर, बाबुराव चहावाला, महेश मेस्त्री, हेमंत नाडकर्णी, भगवान कासले, मंगेश जाधव, नूरमहमद शेख, आदी सर्व व्यापारी बांधव उपस्थितीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!