तळवडे गावातील अनंत रामचंद्र कदम यांना घनस या सापाने सर्पदोष

तळवडे गावातील अनंत रामचंद्र कदम यांना घनस या सापाने सर्पदोष

*कोंकण एक्सप्रेस*

*तळवडे गावातील अनंत रामचंद्र कदम यांना घनस या सापाने सर्पदोष*

*प्रकृती चिंताजनक जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांची माहिती*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

सावंतवाडी तळवडे गावातील अनंत रामचंद्र कदम यांना घनस या सापाने सर्पदोष केल्याने उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल प्रकृती चिंताजनक जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांची माहिती.

सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये तळवडे या गावातील अनंत रामचंद्र कदम मुळगाव दापोली, रत्नागिरी जिल्हा घर कामानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावांमध्ये शेत घरामध्ये गुरुवार दिनांक 16 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घनस या सापाने सर्प दोष केल्याने त्या तळवडे गावातील ग्रामस्थांनी तसेच रुग्णाचे मालक राजाराम गावडे तात्काळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णाला दाखल करण्यात आले लगेचच रक्त चाचणी करून योग्य तो प्राथमिक उपचार रुग्णालयाचे डॉक्टर हृदयरोगतज्ञ विशाल रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दिनेश संगेवार एमबीबीएस रुग्णालयाची परिचारिका यांनी इंजेक्शन व औषधोपचार करून प्राथमिक उपचार करण्यात आले.

तसेच जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांना माहिती कळल्याने तात्काळ रुग्णालयात भेट देण्यात आली.

तसेच राजाराम गावडे सामाजिक कार्यकर्ते संकल्प धारगळकर, दीपक मडगावकर , मिलिंद गावडे, विकास गावडे अनिकेत गावडे, इंद्रजीत गावडे या रुग्णालयात मध्ये आदीने भेट देऊन रुग्णांना धीर दिला त्या रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून तासातासाने विष रक्त चाचणी करून किती प्रमाणात सर्प विष रक्त चाचणी करण्यात आली आहे.

तसेच तळवडे येथील ग्रामस्थांनी घनस सर्प पकडून पिशवीमध्ये कैद करून वन जंगलामध्ये मध्ये सोडण्यात आला अधिक चा उपचार सदरील रुग्णाला डॉक्टर विशाल रेड्डी हृदयरोगतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाला उपचार रुग्णालयात मध्ये सुरू केले असून अधिक उपचार करता गोवा बांबुळी सर्प विष कमी प्रमाणामध्ये होत नसल्याने किडनीवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून किडनी विकार तज्ञ आवश्यकता असल्याने सदरील रुग्णाला पाठवण्यात आले आहे.

कोबरा घनस मनियार पाण्यातील सर्प असे सर्प विष जास्त प्रमाणात असते यामुळे विषबाधा झाल्यानंतर किडनी वरती विपरीत परिणाम रुग्णांना होत असतो यामुळे अशा प्रकारच्या सर्पाने दोष केल्याने नेपोलॉजी किडनी तज्ञ डॉक्टर नसल्याने असे रुग्ण गोवा बांबुळी येथे नाईलाजाने पुढील उपचार करता पाठवावे लागतात अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिली आहे.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

आपला विश्वासू
राजेंद्र प्रभाकर मसुरकर
जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस
सोन्या-चांदीचे व्यापारी
जि. सिंधुदुर्ग, ता. सावंतवाडी
संपर्क क्रमांक=9422435760
8975857716
भेटण्याची वेळ – सकाळी 11 ते 1 सायंकाळी 4 ते 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!