प्राण जीवन सहयोग संस्था, शिरवल व हेल्प अ‍ॅकेडमी कडून मोफत सॅनिटायझर फवारणी

प्राण जीवन सहयोग संस्था, शिरवल व हेल्प अ‍ॅकेडमी कडून मोफत सॅनिटायझर फवारणी

*कोकण Express*

*प्राण जीवन सहयोग संस्था, शिरवल व हेल्प अ‍ॅकेडमी कडून मोफत सॅनिटायझर फवारणी !*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना वाढीच्या अन् कधीही त्याचा विस्फोट होण्याच्या पार्श्वभूमीवर, प्रवेशद्वार सुरक्षित करण्याच्या हेतूने जिल्ह्यातील सामाजिक जाण असलेली प्राण जीवन सहयोग संस्था, शिरवल,कणकवली आणि फोंडाघाटच्या हेल्प अकॅडमी तर्फे फोंडाघाट गावात मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. फवारणीचा शुभारंभ फोंडाघाट स्टॅन्ड येथे सरपंच श्री. संतोष आग्रे यांनी श्रीफळ वाढवून केला. यावेळी उपसरपंच सुदेश लाड, ग्रामसेवक चौलकर, विश्‍वनाथ जाधव ,संदेश पटेल, हेल्प अकॅडमीचे महेश सावंत,सिद्धेश पावस्कर, संजय पटेल, वाहतूक नियंत्रक दया भोगटे आणि सहयोग संस्थेचे जिल्हाप्रमुख प्रसाद मेहता, तालुका प्रतिनिधी प्रशांत गावडे, स्वयंसेवक चकोर सावंत, सिद्धेश परब, अनिप सावंत, विजय परब ,शुभम सावंत मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना प्रशांत गावडे यांनी आमची संस्था कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करून जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी मोफत सॅनिटायझर फवारणीच्या माध्यमातून जनसेवा करत आहे. जीवावर उदार होऊन हे काम करताना पूर्ण सुरक्षा घेतली जाते. आज वर वैभववाडी. मालवण, कणकवली येथे फवारणी झालेली आहे. विषेशतः कंटेनमेंट झोन ठिकाणी ज्यावेळी बोलावणे येते त्या ठिकाणी प्रामुख्याने फवारणी केली जाते. येथील सरपंच संतोष आग्रे व संदेश पटेल यांनी अतिमहत्त्वाचे वेळी बोलावल्याने गावाला त्याचा नक्की फायदा होईल असा आम्हाला विश्वास वाटतो,असे सांगितले.

फोंडाघाटच्या हेल्प अकॅडमीच्या सर्वांनी या संस्थेच्या गाव सॅनिटायझर फवारणीला सहकार्य केले. प्राण जीवन सहयोग संस्थेच्या मोफत सॅनिटायझर फवारणीचे बाजारपेठेतील रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी मुक्तकंठाने कौतुक करतानाच त्यांच्या भावी वाटचालीस व कार्यास शुभेच्छा दिल्या आणि समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!