मालवणचे सुपुत्र डॉ. रत्नाकर कोयंडेंना इनोव्हेशन अॅवॉर्ड प्रदान

मालवणचे सुपुत्र डॉ. रत्नाकर कोयंडेंना इनोव्हेशन अॅवॉर्ड प्रदान

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवणचे सुपुत्र डॉ. रत्नाकर कोयंडेंना इनोव्हेशन अॅवॉर्ड प्रदान*

*मालवण ः प्रतिनिधी*

आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना आणि कर्मचारी कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची आंतरराष्ट्रीयस्तरावर दखल घेत, मालवणचे सुपुत्र डॉ. रत्नाकर कोयंडे यांना इनोव्हेशन अॅवॉर्ड प्रदान करण्यात आले. ‘ड्युटी ऑफ केअर अॅवॉर्ड्स २०२६’ अंतर्गत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार २८ मे रोजी इटलीमधील रोम येथे प्रदान करण्यात आला.

डिजिटल हेल्थ केअर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित उपक्रमांच्या माध्यमातून कर्मचारी आरोग्य, सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. हे उपक्रम रिलायन्स

इंडस्ट्रीजमध्ये राबविण्यात आले असून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हा जागतिक सन्मान प्राप्त झाला. देवबाग हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. रचना खोबरेकर यांचे डॉ. रत्नाकर कोयंडे हे बंधू होय.

या गौरवाबद्दल भावना व्यक्त करताना डॉ. कोयंडे यांनी सांगितले, अनेक वर्षांची मेहनत, समर्पण आणि कामाप्रती असलेली आवड याची जागतिकस्तरावर दखल घेतली गेली, ही अभिमानास्पद बाब आहे. या प्रवासात साथ देणारे कुटुंबिय, मित्र, सहकारी, मार्गदर्शक आणि हितचिंतकांचे आभार मानले. या यशामुळे भविष्यातही समाजहित आणि कर्मचारी कल्याणासाठी अधिक प्रभावी उपक्रम राबविण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!