मेहनत, नाविन्याच्या जोरावर यश मिळवा!*

मेहनत, नाविन्याच्या जोरावर यश मिळवा!*

*कोंकण एक्सप्रेस*

*मेहनत, नाविन्याच्या जोरावर यश मिळवा!*

*मालवण ः प्रतिनिधी*

मालवण तालुका गाबीत समाजातर्फे दहावी, बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील गाबीत समाजातील विद्यार्थ्यांचा गौरव समारंभमालवण धुरीवाडा येथील संस्कार हॉलमध्ये झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष डॉ. रत्नाकर कोयंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. गाबीत समाज सिंधुदुर्गचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, प्रमुख पाहुणे इंजिनियर लक्ष्मीकांत खोबरेकर, गाबीत समाज मालवणचे तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, मालवणचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुदेश आचरेकर, पालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, महिला सभावालविकास समापती अन्येषा आबरेकर, नगरसेविका मेधा सावंत, रविकिरण तोरसकर, जिल्हा सचिव

आजच्या बदलत्या युगात मिळणाऱ्या संधीचा आणि वेळेचा उपयोग मुलांनी आपल्या प्रगतीसाठी केला पाहिजे. यासाठी वेळेचे नियोजन करून मेहनत करावी, नाविन्याचा ध्यास घेऊन गाबीत समाजातील मुलांनी विविध क्षेत्रात प्रगती साधावी, असे प्रतिपादन डॉ. रत्नाकर कोयंडे यांनी येथे केले.

महेंद्र पराडकर, संदेश कोयंडे, माजी नगरसेविका सेजल परब, देवबाग हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रचना खोबरेकर आदी उपस्थित होते.

आरोग्य क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीयस्तरावर गौरविले गेलेले डॉ. रत्नाकर कोयंडे यांचा समाजातर्फे सत्कार करण्यात आला मालवण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले गाबीत समाजातील नगरसेवक सुदेश आचरेकर, सहदेव बापर्डेकर, रविकिरण तोरसकर, दर्शना कासवकर, अन्वेषा आचरेकर, मेघा सावंत यांचाही सत्कार करण्यात आला. दहावी व बारावी परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या मुलांना रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. सतीश खवणेकर, सान्नी कुबल, सीया वाघ यांचा विशेष कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!