*कोकण Express*
*उद्योजक दत्ता काटे यांची सामाजिक बांधिलकी : उंबर्डे प्रा.आ. केंद्र व ग्रामपंचायतींना दिले एकुण 20 पोर्टेबल ऑक्सीजन कॅन*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
तालुक्यातील सांगुळवाडी गावचे सुपुत्र, उद्योजक दत्ता काटे यांच्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतींना एकुण 20 पोर्टेबल ऑक्सीजन कॅनचे वाटप करण्यात आले. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीतून काटे यांनी हे कार्य हाती घेतले आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल शासकीय यंत्रणा व नागरिकांकडून आभार व्यक्त केले जात आहेत. आपत्कालीन काळात रुग्णांना या ऑक्सिजन कँन चा चांगला फायदा होणार आहे.
उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी सदर ऑक्सिजन कॅन वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, डॉ. कांबळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहेत.
यावेळी वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव, उंबर्डे सरपंच एस. एम. बोबडे, उद्योजक दत्ता काटे, मुंबई पोलीस उपनिरीक्षक संदीप सरवणकर, ग्रा.पं. सदस्य उदय मुद्रस व ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. भुईबावडा ग्रामपंचायत मध्ये ऑक्सीजन कॅनचे वितरण करण्यात आले. तसेच तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींना ऑक्सीजन कॅन वितरण करण्याचे काम सुरू आहे.