गतिमान विकासासोबत जनतेला तत्पर सेवा सुविधा देण्यासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध

गतिमान विकासासोबत जनतेला तत्पर सेवा सुविधा देण्यासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध

*कोंकण एक्सप्रेस*

*गतिमान विकासासोबत जनतेला तत्पर सेवा सुविधा देण्यासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध !*

*विकासकामांसाठी कोट्यावधी निधी : आरोग्य सेवेच्या दृष्टीने रिक्त जागी तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती*

*मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी नागरिकांच्या वतीने मानले आ. निलेश राणे यांचे आभार*

*मालवण ः प्रतिनिधी*

गतिमान विकासातून कुडाळ मालवण मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नाशील असून शेकडो कोटी निधी मतदारसंघात प्राप्त झाला आहे. 21 व्या शतकातील आदर्श असे मालवण मालवण शहर घडवणार या संकल्पनेतून मालवण शहाराच्या विकासासाठीही सातत्याने मोठा निधी आमदार निलेश राणे उपलब्ध करून देत आहेत. सोबतच जनतेला तत्पर सेवा सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठीही आमदार निलेश सातत्याने प्रयत्नाशील आहेत. त्यांच्या यशस्वी पाठपुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टर नियुक्ती झाली आहे. मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासोबत जनतेला तत्पर सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध आहेत असे सांगत मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी उपनगराध्यक्ष व महायुतीच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने आमदार निलेश राणे, महायुती सरकार तसेच खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत.

ममता बराडकर यांनी सांगितले, नमो उद्यान, रॉक गार्डन सुशोभीकरण, मामा वरेरकर नाट्यगृह अत्याधुनिक सुविधा व नूतनीकरण यांसह विविध विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. जनहिताच्या दृष्टीने अनेक विकास प्रकल्प प्रस्तावित आहेत. सोबतच सिंधुदुर्गनगरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मालवण शहर देऊळवाडा रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी तब्ब्ल 302 कोटी निधी मंजूर करून आणला.

आमदार निलेश राणे यांच्या रूपाने व्हिजन असलेले नेतृत्व मालवण कुडाळ मतदार संघाला लाभले असून विलासकामातून मतदारसंघ प्रगतीपथावर आहे. असे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले.

विधानसभेतील जनतेचा आवाज

आपल्या अभ्यासपूर्ण आणि ठाम भूमिकेतून जनतेचे प्रश्न प्रत्येक अधिवेशनात प्रभावीपणे मांडून सर्व स्तरातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य आमदार निलेश राणे सातत्यपूर्ण करत आहेत. शेतकरी, कष्टकरी, मच्छिमार, आंबा काजु बागायतदार, दशावतार कलावंत या सर्वांना न्याय मिळवून देताना आ. निलेश राणे म्हणजे विधानसभेतील जनतेचा आवाज ठरले आहेत. असे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!