रायगड जिल्ह्यात २२ ते २९ जुलै दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

रायगड जिल्ह्यात २२ ते २९ जुलै दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*रायगड जिल्ह्यात २२ ते २९ जुलै दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन!*

*​महसूलचे प्रलंबित प्रश्न, दाखले आणि शेतकऱ्यांच्या समस्या एकाच छताखाली तात्काळ सुटणार; प्रमोद जठार यांचे नागरिकांना आवाहन*

*​अलिबाग (विशेष प्रतिनिधी):*

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जनकेंद्री आणि लोककल्याणकारी कार्यपद्धतीपासून प्रेरणा घेऊन, महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान राबविण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि महसूल मंत्री तथा अभियान अध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
​या अभियानाचा एक भाग म्हणून, रायगड जिल्ह्यात २२ जुलै ते २९ जुलै २०२६ या कालावधीत विशेष ‘जयंती सप्ताह शिबिरांचे’ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अभियानाचे रायगड जिल्हा प्रभारी व वि.प.स. श्री. प्रमोद जठार यांनी दिली आहे.
​राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि लोकनेते कै. मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या दोन्ही कार्यक्षम प्रशासकांच्या कार्यशैलीला साजेसे काम करत, जनतेच्या प्रश्नांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी या विशेष सप्ताहाचे आयोजन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील महसूल मंडळात केले जात आहे.
​अभियानाचा मुख्य उद्देश आणि मिळणाऱ्या सेवा:
​नागरिकांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, कागदपत्रे आणि दाखले जलद, सुलभ व पारदर्शक पद्धतीने एकाच छताखाली मार्गी लावणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरांमध्ये खालील सेवा तात्काळ पुरविल्या जाणार आहेत:
​७/१२ आणि ८-अ उतारा दुरुस्ती: वारस हक्काने नावे लावणे, वाटणीपत्र, बक्षीसपत्र, खरेदीखताद्वारे नावे लावणे, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ चे तात्काळ वाटप.
​शेतकऱ्यांसाठी सुविधा: भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये बदलणे, ७/१२ वर पीक पाणी नोंदवणे, शेतजमीन तुकडा बंदी नियमित करणे.
​मोजणी व रस्ते: ऑनलाईन जमीन मोजणी अर्ज स्वीकारणे व गती देणे, मोजणीचे ‘क’ प्रमाणपत्र देणे. शेतजमिनीसाठी बांधावरील पानंद रस्ते आखणे व ते अधिकृत करणे.
​दाखल्यांचे वाटप: उत्पन्न, रहिवासी, जात, नॉन-क्रिमिलेअर आणि विद्यार्थ्यांचे दाखले. शाळा-महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांचे दाखले वाटप.
​नुकसान भरपाई व कर्जमाफी: दुष्काळ/अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ मोबदला मिळवून देणे, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणे.
​इतर योजना: अकृषिक (NA) प्रमाणपत्र मार्गदर्शन, भूसंपादित प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे मोबदला व प्रमाणपत्र देणे, तसेच पीएम किसान (PM Kisan) नोंदणी करणे.
​माध्यमांना सहकार्य करण्याचे आणि नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!