पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठकांचे आयोजन

पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठकांचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठकांचे आयोजन*

*सिंधुदुर्गनगरी, दि.१३ (जि.मा.का):-*

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार (दि. १५ जुलै) रोजी जिल्हा नियोजन समिती व डोंगरी विकास सभा, सिंधुरत्न योजना बैठकीचे आयोजन करण्यात आले आहेत. तसेच खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समिती सभा आणि रस्ता सुरक्षा समितीची बैठक देखील संपन्न होणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांनी कळविले आहे.
या बैठकांना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रमोद जठार, अनिकेत तटकरे, दिपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत. बैठकांची वेळ खालील प्रमाणे- सकाळी १०:००-११:३० वा. दिशा समिती सभा, (स्थळ – सिंधुनीती सभागृह) , सकाळी १२:००-२:०० वा. जिल्हा नियोजन समिती व डोंगरी विकास सभा (स्थळ- सिंधुनीती सभागृह) दुपारी २:००-२:१५ वा. रस्ता सुरक्षा समिती , (स्थळ- सिंधुनीती सभागृह), दुपारी ३:००- ४:०० वा. सिंधुरत्न योजना बैठक, (स्थळ- मायनाक भंडारी सभागृह) येथे बैठका पार पडणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!