*कोंकण एक्सप्रेस*
*रस्तावरील खड्डयाचा प्रश्न ऐरणीवर, सांगुळवाडीत रिक्षा पलटी होऊन अपघात, ग्रामस्थानी रोखला मार्ग*
*वैभववाडी (प्रतिनिधी)*
तालुक्यातील सांगुळवाडी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे शुक्रवारी दुपारी रिक्षा पलटी होऊन अपघात झाला यात तिन प्रवाशी जखमी झाले असून यानंतर ग्रामस्तानी रस्तारोको केल्याने नावळे, अरुळे सडूरे रस्त्यावरील वाहतूक तासभर पुर्ण पणे बंद होती सभापती सिद्धेश रावराणे आणि नागराध्यक्ष श्रद्धा रावराणे यांनी सोमवार पर्यंत खड्डे भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित कारण्यात आले.
अपघातानंतर शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी रावराणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रास्ता रोको करुन तासभर वैभववाडी नावळे – सडुरे रस्ता वाहतूकी साठी बंद केला त्यामुळे सुमारे तासभर हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला होता अपघातची माहिती मिळताच सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, पं.स.सदस्य देवानंद पालांडे घटनास्थळी दाखल झाले यावेळी ग्रामस्तानी नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करीत आतापर्यंत चार अपघात झाले आहेत मात्र प्रशासनाला जाग येत नाही असे खडे बोल सुनावले या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी निवेदन देऊनही नगर पंचायत प्रशासनाकडून दुर्लक्षित होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी नगरपंचायतीच्या अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले अखेर सभापती व नगराध्यक्ष यांनी सोमवारपर्यंत मार्ग सुस्थितीत केला जाईल असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन केलं स्थगित केले.

