*कोंकण एक्स्प्रेस*
*कनेडी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन*
*कणकवली : प्रतिनिधी*
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड काॅमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, बालमंदिर कनेडी (इंग्रजी माध्यम) आणि राष्ट्रीय विज्ञान संवादक केंद्र (National Centre for Science Communicators – NCSC), मुंबई यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी “करिअर गाईडन्स प्रोग्राम – Explore • Discover • Achieve” या विशेष करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि. १०/०६/२०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० या वेळेत करण्यात आले.
कनेडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील इयत्ता ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी तसेच परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम मोफत होता. या कार्यक्रमाला ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून करिअरच्या नवनवीन संधी अवगत करुन घेतल्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या मनातील प्रश्नांची उकल करायला चांगली संधी मिळाली.
कार्यक्रमामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, कृषीशास्त्र, गणित व सांख्यिकी तसेच अभियांत्रिकी या विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. संशोधन, अवकाश विज्ञान, जैवतंत्रज्ञान, डेटा सायन्स, कृषी व्यवसाय, संगणकशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान आदी क्षेत्रांतील संधींची माहिती विद्यार्थ्यांना विस्तृत स्वरूपात प्राप्त झाली.
सदर कार्यक्रमात सुरुवातीला डॉ. चंद्रशेखर मराठे यांनी भौतिकशास्त्र या विषयी असणाऱ्या करिअरच्या संधी या विषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. संजय भागवत यांनी जीवशास्त्र व कृषीशास्त्र या विषयातील करिअरच्या संधी या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले. श्री. परेश चिटणीस यांनी संगणक व आयटी सुरक्षा या विषयी करिअरच्या कोणकोणत्या नवनवीन संधी आहेत या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी श्री. सुहास नाईक-साटम यांनी खगोलशास्त्र या विषयामधील करिअर संधी या विषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे अध्यक्ष सन्मा. श्री. सतीश सावंत यांनी भूषविले. या कार्यक्रमाला संस्था संचालक श्री. संजय लहू सावंत, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व इतर शालेय समिती सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री. बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाचा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी चांगला लाभ करून घेतला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व नवनवीन क्षेत्रातील करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना माहिती व्हाव्यात या उद्देशाने अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम व उपक्रम कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई ही संस्था कायम करत असते. याचमुळे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सलग दोन वर्षे माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेचा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आला आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माने सर यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सन्मा. श्री. सतीश सावंत यांनी केले.
कनेडी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन