कणकवली उड्डाण पुलाखालील अस्वच्छतेबाबत मनसेकडून निवेदन*  *शिरगांव : संतोष साळसकर*

कणकवली उड्डाण पुलाखालील अस्वच्छतेबाबत मनसेकडून निवेदन* *शिरगांव : संतोष साळसकर*

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली उड्डाण पुलाखालील अस्वच्छतेबाबत मनसेकडून निवेदन*

*शिरगांव : संतोष साळसकर*

कणकवली शहरातील उड्डाण पुलाखाली मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्यामुळे व अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून परिसरात दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली.
याबाबत आज नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष शांताराम सादये, मनविसे जिल्हाध्यक्ष अनिकेत अनंत तर्फे मनविसे शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव उपस्थित होते.
उड्डाण पुलाखाली नियमित साफसफाई करावी तसेच भविष्यात अस्वच्छता होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!