मळेवाड येथे दाखल्यांकरिता शिबिर, ग्रामपंचायत चा अभिनव उपक्रम

मळेवाड येथे दाखल्यांकरिता शिबिर, ग्रामपंचायत चा अभिनव उपक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*मळेवाड येथे दाखल्यांकरिता शिबिर, ग्रामपंचायत चा अभिनव उपक्रम*

*मळेवाड ः प्रतिनिधी*

विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक असणारे उत्पन्न दाखला करिता ग्रामपंचायत मुळेवाड कोंडुरे कडून शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते याचा शुभारंभ सरपंच सर्व मिलन पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लागला असून आता विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेसाठी लगबग सुरू झाली आहे या प्रवेश प्रक्रिया करिता लागणारा एक वर्ष व तीन वर्ष उत्पन्न दाखला हा गरजेचा असल्याने ग्रामपंचायत मुळेवाड कोंडूरेकडून गावातील विद्यार्थ्यांकरिता दाखला आपल्या दारी शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते. याचा शुभारंभ सरपंच सर्व मिलन पार्सेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. गावातील वीर विद्यार्थ्यांना सावंतवाडी तहसीलदार किंवा अन्य खाजगी आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये जाऊन तेजा करावी लागू नये तसेच आर्थिक व वेळेचा अपव्य होऊ नये व दाखले तात्काळ वेळेत मिळावे यासाठी गावात ग्रामपंचायत मार्फत गावातील विद्यार्थ्यांकरिता सदरचे शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सांगितले. या शिबिराकरता सावंतवाडी सेतू सुविधा केंद्रातील संजय व मुळेवाड तलाठी अनुजा भास्कर यांचे विशेष सहकार्य लाभले सदस्य शिबिर सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!