रेल्वे प्रवाशाची ताकद एकजूट दाखविणारी १७ रोजी ‘सिधुदुर्ग रेल्वे परिषद ‘

रेल्वे प्रवाशाची ताकद एकजूट दाखविणारी १७ रोजी ‘सिधुदुर्ग रेल्वे परिषद ‘

*कोंकण एक्सप्रेस*

*रेल्वे प्रवाशाची ताकद एकजूट दाखविणारी १७ रोजी ‘सिधुदुर्ग रेल्वे परिषद ‘*

*सिंधुदुर्गनगरी*

कसाल येथे सिंधुदुर्गनगरी  १३ कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या कोकणी प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी आणि समस्या बाबत चर्चा करण्यासाठी आणि या समस्यांवर योग्य तो समन्वय साधण्यासाठीकसाल येथे १७ मे रोजी साई माऊली ब्लॅकेट हॉल येथे सिंधुदुर्ग रेल्वे परिषदआयोजित केली आहे तरी जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रा रेल्वे प्रवाशांच्या या हक्काच्या सोयीसुविधा मिळण्यासाठी निकराची लढाई म्हणूनरेल्वे प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या परिषदेला उपस्थित राहावेअसे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश पावस्कर जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणी रेल्वे प्रवाशांना अनेक समस्यातून सामोरे जावे लागत आहेमुंबईहून मडगाव कारवार कडे जाणारे ८५ पेक्षा अधिक गाड्या आहेत त्यापैकी फक्त ३२ गाड्या सिंधुदुर्गात थांबतात या रेल्वे गाड्यांमध्येही परप्रांतीयांचेच लोंढे अधिक प्रमाणात असून आम्हा कोकणी प्रवाशांना संडासाच्या बाजूला किंवा दरवाज्यात बसूनच प्रवास करावा लागत आहे तुतारी दादर गाडीला जादा डबे वाढवावे वसई ते मडूरे,दादर सावंतवाडी यासारख्याअनेक गाड्या मागणी करू नये रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे प्रवासी समन्वय समितीने सातत्याने या प्रश्नावर आवाज उठून काही प्रश्नांचे निरसन झाले परंतु प्रवाशांच्या बऱ्याच समस्या कडे दुर्लक्षच झाल्यामुळे आम्हाला ही रेल्वे परिषद घ्यावी लागत आहेसतरा रोजी होणाऱ्या या रेल्वे परिषदेत खा नारायणराव राणे पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेशराणे जि.प. अध्यक्ष प्रमोदकामत सर्व जि .प . पदाधिकारी जि.प. सदस्य सह लोक प्रातिनिधी ,रेल्वेचे प्रमुख अधिकारी, जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी, विविध रेल्वे प्रवासी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.याबरोबर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशी संघटना पदाधीकारी सदस्य, सरपंच,महिला प्रतिनिधी बचतगट प्रवाशी ग्रामस्थ यांना निमंत्रीत केले आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या या रेल्वे परिषदेमध्ये रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या प्रश्न मांडण्यात येणार आहेत याच बरोबर विवीध समश्या निवेदने स्विकारण्यात येणार आहेत आतापर्यंत सिधुदुर्गातील रेल्वे प्रवाशाच्या अनेक रेल्वेच्यासमस्यांना वाचा फोडण्यासाठी होणाऱ्या या रेल्वे परिषदेला रेल्वे प्रवासी आणि मुंबईकर चाकमान्यानीउपस्थित राहून आपली कोकण वासियांची ताकद या सिंधुदुर्ग रेल्वे परिषदेतूनदाखवून देऊया
कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समितीच्या माध्यमातून आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाही प्रमुख स्टेशनच्या समस्या लोकप्रतिनिधी रेल्वेमंत्री आणि रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांपर्यंत मांडले आहेत जिल्ह्याचे खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या समावेत झालेल्या बैठकीतून काही प्रश्नांना वाचा फुटली सिंधुदुर्ग आणि कणकवली स्टेशनवर प्रत्येकी दोन गाड्यांना थांबा सिंधुदुर्ग स्टेशनवर पी आर एस तिकीट काउंटर सुरू झाले तरीही अजूनही नांदगाव येथे होऊ घातलेली कृषी बाजार समिती आणि वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग या दृष्टीने स्वतंत्र तिकीट काउंटर सावंतवाडी बेळगाव रेल्वे मार्गपर्यटनाच्या दृष्टीने आणि पर्यटन वाढीच्या दृष्टीने नांदगाव देवगड मालवण वेंगुर्ले आणि सावंतवाडी असा किनारपट्टी रेल्वे मार्ग आधी अनेक मागण्या बरोबर सिंधुदुर्गात रेल्वेचे दुपदरीकरण काम गतीने व्हावे जेणेकरून जलद गाड्या कमी वेळात मुंबई गाठता येईल आणिगोवा कारवार कर्नाटक नव्हे तर रत्नागिरीसिंधुदुर्गातील जादा स्टेशनला थांबे मिळतील हा या मागचा उद्देश आहेही बाब आम्ही आतापर्यंत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या आणि कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यातील खासदार आमदारांना निवेदनाद्वारे मांडली आहे प्रवाशांच्या या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि प्रवाशांची सिंधुदुर्ग वाशी यांची आणि कोकणवासीयांची ताकद एक जुट दाखविणारीही सिंधुदुर्ग रेल्वे परिषद होत आहे याला सिंधुदुर्ग वासीय रेल्वे प्रवासी लोकप्रतिनिधी सरपंच सामाजिक संघटना महिला संघटना यादी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवून प्रतिसाद द्यावा असे आवाहन या पत्रकार परिषदेतून अध्यक्ष प्रकाश पावस्कर आणि जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!