माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प

माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प

*कोंकण एक्सप्रेस*

*माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प*

*कलंबिस्त इंग्लिश स्कूल,च्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा झाला स्नेहमेळावा*

*वर्गमित्र एकत्र येत जुन्या आठवणींना दिला उजाळा*

*दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प*

*कलंबिस्त( सावंतवाडी) :*

कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांची “आठवणींची शाळा” ही वर्गमित्र पुनर्भेट नुकतीच आंबोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. प्रतिवर्षाप्रमाणे एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत शालेय जीवनातील अनुभवांना पुन्हा उजाळा दिला.

या पुनर्भेटीच्या निमित्ताने “दिशा फाउंडेशन”च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सहाय्य, पर्यावरण संवर्धन तसेच समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. सांस्कृतिक कार्यक्रम, मैत्रीपूर्ण संवाद, जुन्या छायाचित्रांचे प्रदर्शन आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. भविष्यातही अशा स्वरूपाचे सामाजिक व स्नेहमेळावे आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

या कार्यक्रमाला १९९३-९४ बॅचमधील सतीश सावंत, दीपक राऊळ, अनिल राऊळ, प्रवीण कुडतरकर, सुभाष कुडतकर, महेश मडगावकर, विलास राऊळ, राजू गोवेकर, विष्णू राऊळ, महेश राऊळ, संतोष राऊळ, जयद्रथ राऊळ, दीपा नाईक, जुली अल्फान्सो, कलेशा म्हाडगुत, रजनी पास्ते, संगीता गावडे-शेडगे आदी वर्गमित्र-मैत्रिणी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!