एसटीएस परीक्षेच्या इस्रो दौऱ्याचा कणकवलीत शुभारंभ

एसटीएस परीक्षेच्या इस्रो दौऱ्याचा कणकवलीत शुभारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*एसटीएस परीक्षेच्या इस्रो दौऱ्याचा कणकवलीत शुभारंभ*

कणकवली / प्रतिनिधी

युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत यश प्राप्त केलेल्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 30 विद्यार्थी शनिवारी इस्रो येथे रवाना झाले. या इस्रो अभ्यास दौऱ्याचा शुभारंभ शनिवारी सकाळी युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ संजना सावंत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले. यावेळी संजना सावंत यांच्या हस्ते शिव पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच श्रीफळ वाढवून दौऱ्याचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी दौऱ्यावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते नोट पॅड व पेन देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

शुभारंभ प्रसंगी एसटीएस परीक्षाप्रमुख सुशांत मर्गज, प्रशांत बोभाटे, समीर पाटील, मनोज पीळणकर,राजाराम भिसे, महेश चव्हाण, उमेश केसरकार, आणि शिक्षण प्रेमी उपस्थित होते

11 मे पर्यंत असलेल्या या इस्रो दौऱ्यात बेंगलोर व म्हैसूर परिसरातील पर्यटन स्थळांना भेट घडवण्यात येणार आहे.

या मध्ये विश्वेश्वराय म्यूजियम, विधानसभा, वृंदावन गार्डन, म्हैसूर झू, म्हैसूर पॅलेस, म्हैसूर रेल म्यूजियम, कार म्यूजियम आणि परिसरातील पर्यटन स्थळांचा समावेश आहे.

युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता 1 ली ते 7 वी साठी सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS- परीक्षेचे आयोजन करण्यात येते. मराठी, सेमी इंग्रजी माध्यमात घेण्यात येणाऱ्या या स्पर्धा परिक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 30 व रत्नागिरी जिल्ह्यात 27 परीक्षा केंद्रे असतात. गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची रोख पारितोषिके, मेडल्स, सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येते तसेच जिल्हा गुणवत्ता यादीतील 4 थी ते 7 वी मधील प्रत्येक इयत्तेतील पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ईस्त्रो सफरीसाठी निवड करण्यात येते.

पुढील शैक्षणिक वर्षात ही परीक्षाh रविवार 17 जानेवारी 2027 रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!