*कोंकण एक्सप्रेस*
*माजी विध्यार्थ्यानी एकत्र येऊन शाळेचा सुवर्णमहोत्सव साजरा केल्याबद्दल विशेष कौतुक. यां प्रशालेच्या भौतिक विकासासाठी माझे नक्कीच सहकार्य मिळेल. : सभापती गणेश राणे*
*चाफेड भोगलेवाडी प्रशालेचा सुवर्णंमहोत्सव उत्साहात साजरा*
*माजी शिक्षक, जमीनदार, जेष्ठ नागरिक तसेच सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विजय भोगले, सुधीर राणे यांचे सेवानिवृतिपर विशेष सत्कार*
*शिरगांव : संतोष साळसकर*
चाफेड – भोगलेवाडी शाळेतून शिकून गेलेल्या मुलानी समाजात विविध स्तरावर या शाळेचे आणि गावाचे नावलौकिक केले आहे या माजी विद्यार्थ्यांनी या प्रशालेचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम भव्य दिव्य असा साजरा केला त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक. भविष्यात या प्रशालेच्या भौतिक विकासासाठी माझ्याकडून नक्कीच सहकार्य मिळेल असे प्रतिपादन देवगड पंचायत समिती सभापती गणेश राणे यांनी बोलताना व्यक्त केले
देवगड तालुक्यातील जि. प.पू.प्रा. शाळा चाफेड – भोगलेवाडी या प्रशालेला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 7 मे रोजी माजी विद्यार्थ्यां संघाचे अध्यक्ष विजय भोगले यांच्या अध्यक्षतेखाली सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी सभापती गणेश राणे बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि इशास्तवनाने करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर देवगड पं. स. सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विजय भोगले, केंद्र मुख्याध्यापक सुगंध तांबे, सरपंच साहिल पांचाळ, मुख्याध्यापक दयानंद पांडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष तथा माजी सरपंच सत्यवान भोगले, माजी विद्यार्थी संघाचे सचिव महेश परब, खजिनदार प्रशांत राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल्ल परब, माजी सभापती नंदू देसाई, जि. प. सदस्य देवदत्त कदम, पं. स. सदस्या शितल तावडे, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विजय परब, ग्रामसेवक प्रथमेश देशमुख, ग्रा. स. सुनील कांडर, सुदर्शन साळकर, सौ. प्रियांका भोगले, माजी मुख्याध्यापिका सौ. रश्मी आंगणे, गोविंद उर्फ बापू कांडर, माजी सरपंच संतोष साळस्कर, सेवानिवृत्त शिक्षक बापू चव्हाण, वसंत काळगे, विकास वाडीकर, धनंजय गुंजाळ, सत्यपाल लाडगावकर, सेवानिवृत्त शिक्षक सुधीर राणे आदींसह माजी विद्यार्थी माजी शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी विद्यार्थिनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच या शाळेचे माजी विद्यार्थी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विजय भोगले यांचा सभापती गणेश राणे यांच्या हस्ते सेवानिवृत्तीवर पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षक सुधीर राणे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी 50 वर्षांपूर्वी या शाळेसाठी परब कुटुंबीयांनी विनामूल्य जमीन दिल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच जेष्ठ नागरिक आणि माजी शिक्षकांचाहि सत्कार करण्यात आला.
सकाळ सत्रात श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी आणि रात्री महाप्रसाद, चाफेड भोगलेवाडी आणि पिंपळवाडी ग्रामस्थांची सुस्वर भजने, रात्री माजी विद्यार्थ्यांचा सुसंवाद आणि विविध गुणदर्शन पर कार्यक्रम पार पडले. त्यानंतर श्री सिद्धेश कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार कुडाळ नेरूर यांचा “पृथ्वी कंकण” हा ट्रिक्स सिन युक्त दशावतारी नाट्य प्रयोग सादर करण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्तावना गोविंद उर्फ बापू कांडर, यांनी तर सूत्रसंचालन व आभार दीपक साटम यांनी केले.

