ग्रामविकास मंडळ चाफेड ( पिंपळवाडी ) 11 ते 12 मे यां कालावधीत विविध कार्यक्रम

ग्रामविकास मंडळ चाफेड ( पिंपळवाडी ) 11 ते 12 मे यां कालावधीत विविध कार्यक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*ग्रामविकास मंडळ चाफेड ( पिंपळवाडी ) 11 ते 12 मे यां कालावधीत विविध कार्यक्रम*

*शिरगांव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील ग्राम विकास मंडळ चाफेड ( पिंपळवाडी ) यां मंडळाच्या वतीने सोम. दि. 11 मे ते 12 मे या कालावधीत श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली असून यानिमित्त विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार दिनांक सायंकाळी 5 ते 7 वाजता महिलासाठी “महाराष्ट्र मधील मराठमोळे शाकाहारी खाद्यपदार्थ” या विषयावर खुली पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी प्रथम पारितोषिक मानाची पैठण पैठणी व सोन्याची नथ, द्वितीय – प्रेशर कुकर तृतीय – फ्राय पॅन, चौथे – आकर्षक भेटवस्तू, पाचवे – आकर्षक साडी, मंगळ. दि. 12 मे रोजी सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, 4 ते 6 वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ,6 ते 9 वा. स्थानिक निमंत्रित भजने, 9 वाजता कुडाळ नेरूर येथील सिद्धेश कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा ट्रिक्स सिन युक्त “जय जय रवळनाथ” हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!