*कोंकण एक्सप्रेस*
*सरंबळ दुर्गावाड घरावर विज कोसळून नुकसान…*
*जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांची तातडीची मदत..*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
तालुक्यातील सरंबळ दुर्गावाड धनगरवाडी येथील रामा बापू वरक यांच्या राहत्या घरावर व माडावर विज कोसळून मोठे नुकसान झाले. त्यांच्या घराचे १०-१२ पत्रे फुटून गेले. तसेच उत्पन्न देणारे माडाचे झाड जळून नुकसान झाले. तसेच घरातील विद्युत फिटिंगचे सुद्धा नुकसान झाले आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी आर्थिक मदत करत कुडाळ तहसीलदार यांना फोनवर नुकसानीची माहिती दिली. तातडीची मदत म्हणून पत्रे उपलब्ध करण्यास सांगितले असता तहसीलदार यांनी तलाठी यांना पत्रे उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच माजी उपसरपंच समद मुजावर यांनी दुर्गावड ग्रामस्थ यांच्या वतीने आर्थिक मदत सुपूर्द केली.
यावेळी सरपंच रावजी कदम, उपसरपंच सागर परब, माजी उपसरपंच समद मुजावर, सरंबळ तलाठी संतोष हिंदक, सहकारी तलाठी स्नेहल सागरे, ग्रामस्थ शैलेश परब, मंदार परब, फिरोज फतीब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

