कणकवलीत ‘अंतर ज्ञान प्रक्रिया’ (प्रज्ञा योग) शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसा

कणकवलीत ‘अंतर ज्ञान प्रक्रिया’ (प्रज्ञा योग) शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसा

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीत ‘अंतर ज्ञान प्रक्रिया’ (प्रज्ञा योग) शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*

*४० ते ४५ विद्यार्थ्यांचा सहभाग; मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना*

*कणकवली ः संजना हळदिवे*

आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या वतीने कणकवली येथे आयोजित करण्यात आलेले ‘अंतर ज्ञान प्रक्रिया’ (प्रज्ञा योग) हे विशेष शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला सुमारे ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. या शिबिरामध्ये आर्ट ऑफ लिविंग च्या तज्ञ मार्गदर्शकानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

हे शिबिर २ ते ५ मे २०२६ दरम्यान कणकवलीतील उत्कर्षा हॉल येथे सकाळी ८ ते १ या वेळेत प्रत्यक्ष पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर ६ ते १२ मे या कालावधीत ७ दिवसांचा ऑनलाईन सराव (झूम मीटिंगद्वारे) घेण्यात येणार आहे. ८ ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी उपयुक्त ठरलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला.

 

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये मुलांच्या अंतःप्रज्ञा (Intuition) क्षमतेचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.शिबिरादरम्यान योग, प्राणायाम, ध्यान तसेच मेंदू सक्रिय करणारी विविध तंत्रे विद्यार्थ्यांना शिकवण्यात आली.

या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि निर्णयक्षमता वाढीस लागण्यास मदत झाली. तसेच तणावमुक्त राहणे, अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे यासाठीही शिबिर उपयुक्त ठरले. खेळ, गटचर्चा आणि विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक प्रभावी झाला.

शिबिरानंतर विद्यार्थ्यांमध्ये जाणवलेले सकारात्मक बदल, वाढलेली स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास यामुळे पालकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात आले. हा उपक्रम मुलांच्या अंतर्गत क्षमतांना जागृत करणारा ठरल्याचे मत प्रशिक्षक उमेश वायंगणकर यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!