सिंधुदुर्गात आज तब्बल १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सिंधुदुर्गात आज तब्बल १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

*कोकण Express*

*सिंधुदुर्गात आज तब्बल १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू…*

*डॉ.श्रीपाद पाटील; जिल्ह्यात नव्याने आढळले १९७ रुग्ण…*

*सिंधुदुर्गनगरी ता.२६:-*

जिल्ह्यात आज तब्बल १३ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आणखीन १९७ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ८ हजार ४४३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ८९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.मृतांमध्ये इन्सुली-सावंतवाडी येथील ५३ वर्षीय महिला आहे. तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. उंबर्डे-वैभववाडी येथील ७९ वर्षीय महिला आहे. तिला मधुमेह,उच्चरक्तदाबाचा त्रास होता. भरड-मालवण येथील ५९ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. कुणकवणे-देवगड येथील ६५ वर्षीय पुरुष आहे. त्याला मधुमेह,उच्चरक्तदाबाचा त्रास होता. चौके-मालवण येथील ७० वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. मेंढा-मालवण येथील ६० वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. नाधवडे-वैभववाडी येथील ५५ वर्षीय महिला आहे. तिला मधुमेहाचा त्रास होता. वराड-मालवण येथील ६२ वर्षीय पुरुष आहे. त्याला मधुमेह,उच्चरक्तदाबाचा त्रास होता. गाडीअड्डा-वेंगुर्ला येथील ६२ वर्षीय महिला आहे. तिला मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास होता. वैभववाडी येथील ६८ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. मालवण येथील ६५ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. पडवे-कुडाळ येथील ६१ वर्षीय महिला आहे. तिला मधुमेह,उच्चरक्तदाबाचा त्रास होता. उभादांडा-वेंगुर्ला येथील ५५ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. दरम्यान १३ जणांचा मृत्यू हा जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!