नांदगाव येथे ‘श्री देव कोळंबा जत्रा’ उत्साहात साजरी होणार; ३ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन*

नांदगाव येथे ‘श्री देव कोळंबा जत्रा’ उत्साहात साजरी होणार; ३ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन*

*कोंकण एक्सप्रेस*

*नांदगाव येथे ‘श्री देव कोळंबा जत्रा’ उत्साहात साजरी होणार; ३ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन*

*कणकवली ः संजना हळदिवे*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री देव कोळंबा देवाची वार्षिक जत्रा यावर्षी रविवार, ३ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. ‘भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा’ अशी ख्याती असलेल्या या देवाच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक गर्दी करतात.

या निमित्त मंदिर समितीच्या वतीने दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ, नांदगाव यांचे अध्यक्ष नागेश मोरये यांनी केले आहे.

दिवसभराचा नियोजित कार्यक्रम:

जत्रेच्या दिवशी सकाळी ८ वाजेपासून कार्यक्रमांना सुरुवात होईल. त्याचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

सकाळी ८.०० ते ९.००: शास्त्रोक्त पद्धतीने पूजाविधी पार पडेल.

सकाळी ९.०० ते दुपारी २.००: ‘नवसफेड’ करण्याचे विधी पार पडतील. ज्या भाविकांनी नवस बोलले आहेत, ते या काळात आपली फेड करू शकतील.

दुपारी १२.०० ते ४.००: नवीन नवस बोलणे.

सायंकाळी ४.०० ते ८.००: सर्व भाविकांसाठी ‘महाप्रसाद’ वाटप करण्यात येईल.

नांदगाव आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या जत्रौत्सवासाठी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!